ICC Ranking: ICC रॅकिंगमध्ये मोठा उलटफेर, टीम इंडियाची तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थानी झेप

ICC Team Ranking 2024: ICC रॅकिंगमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडिया प्रथम स्थानी आहे.
 Team India
Team IndiaSaam Tv

Latest Cricket News

टीम इंडियाच्या फॅन्ससाठी खूशखबर आहे. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाला मोठं 'बक्षिस' मिळालं आहे. कसोटी मालिकेतील विजयानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली (Team India At Top Position) आहे. टी-२० आणि वनडेमध्ये भारत आधीच अव्वल होता, पण इंग्लंडला नमवून टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-१ बनली आहे. (Cricket news in marathi)

टीम इंडियाने अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा एक डाव आणि ६४ धावांनी पराभव केला. अशीरितीने टीम इंडियाने पाच सामन्यांची कसोटी मालिका ४-१ अशी (ICC Ranking) जिंकली. यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या टीम इंडियाचे कसोटीमध्ये १२२ गुण आहेत. तर टी-२० मध्ये २६६ गुण आणि वनडेमध्ये १२१ गुण आहेत. ऑस्ट्रेलियन संघाचे कसोटीमध्ये ११७ गुण आहेत आणि ते सध्या दुसऱ्या स्थानावर (ICC Team Ranking 2024) आहेत.

याआधीही टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-१ बनली होती. कसोटी आणि T-२० मध्ये अव्वल क्रमांक मिळवल्यानंतर, दरम्यान भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली आणि आयसीसी क्रमवारीत एकदिवसीय क्रमवारीतही पहिले स्थान मिळवले (Cricket News) होते.

 Team India
Former Rajasthan Cricketer Dies : राजस्थानचा माजी रणजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन; क्रीडा विश्वावर शोककळा

एकदिवसीय मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली होती. त्यानंतर भारताला कसोटी क्रमवारीतील पहिले स्थान गमवावे लागले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी पोहोचली (Sports News) होती. मात्र आता पुन्हा टीम इंडियांना तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे.

 Team India
Indian Cricketer Hoysala K Death : भारताच्या युवा क्रिकेटपटूचं सामन्यानंतर निधन, क्रीडाविश्वावर शोककळा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com