क्रीडाविश्वातून दु:खद घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील सुहैब यासीनचं निधन झाल्याची घटना घडली. त्यानंतर आणखी एका युवा खेळाडूचं निधन झालं आहे. होएसाला के असं या खेळाडूचं नाव आहे. कर्नाटकातील होएसाला के याच्या निधनानंतर क्रीडाविश्वावर शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)
३५ वर्षीय क्रिकेटर होएसाला के याचं निधन झाल्यानंतर कर्नाटकातील आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी 'एक्स'वर पोस्ट लिहित दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटलं की,'कर्नाटकातील खेळाडूच्या मृत्यूच्या वृत्ताने दु:ख झालं. एजिस साऊथ झोन स्पर्धेदरम्यान जलद गोलंदाज होएसाला के याच्या मृत्यूची घटना घडली आहे. मी त्याचे मित्र आणि कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त करतो. कार्डियाक अरेस्टमुळे त्याचा मृत्यू झाला आहे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भारताचा माजी क्रिकेटपटू अभिमन्यू मिथून यानेही पोस्ट करत दु:ख व्यक्त केलं. अभिमन्यूने पोस्ट करत म्हटलं की, 'मी कधीही विचार केला नव्हता की, असं काही लिहायची वेळ येईल. आपण चांगला माणूस गमावला आहे. तो एक चांगला क्रिकेटपटू होता. एक चांगला काळजी घेणारा मित्र होता. तसेच एक चांगला मुलगा होता. होएसाला के खूप लवकर जग सोडून गेला. मी त्याला कधीही विसरू शकत नाही. Rest in peace Hoysi!'.
'होएसाला के'च्या विषयी बोलायचं झालं तर तो बेंगळुरुमध्ये तामिळनाडूच्या विरोधात संघासोबत बैठकीत बोलत होता. त्यानंतर तो जेवण करायला गेला. त्याचवेळी अचानक त्याच्या छाती दु:खू लागलं. त्यानंतर अचानक तो बेशुद्ध झाला. त्यामुळे तातडीने त्याला जवळील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत त्याला उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही सर्व घटना २२ फेब्रुवारीची आहे. ही सर्व घटना २३ फेब्रुवारीला समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.