ICC ODI Ranking : वनडे रँकिंगच्या टॉप १० मध्ये मोठी उलथापालथ; रोहित शर्मालाही जोरदार दणका

ICC ODI Rankings top 10 shake up rohit sharma drops : आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या वनडे रँकिंगमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. टॉप १० मध्ये उलटफेर झाला असून, माजी कर्णधार रोहित शर्मालाही जोरदार दणका बसला आहे.
वनडे रँकिंग जाहीर, रोहित शर्माला मोठा दणका
शुभमन गिल आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे. तर रोहित शर्माचे मोठे नुकसान झाले आहे. saam tv
Published On: 

आयसीसीने आज, बुधवारी वनडे रँकिंग प्रसिद्ध केली. या यादीतील टॉप १० मध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. भारताचा कर्णधार शुभमन गिल रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी कायम आहे. पण भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माचं मोठं नुकसान झालं आहे. आता त्याच्या रँकिंगमध्ये एका स्थानाची घसरण झाली आहे. विराट कोहली देखील टॉप १० मध्ये आहे. आगामी दिवसात बरेच वनडे सामने होणार आहेत. त्यामुळे रँकिंगमध्ये पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.

भारताचा कर्णधार शुभमन गिल टॉप १

न्यूझीलंडच्या विरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्याच्या आधी आयसीसीने वनडे रँकिंग जाहीर केली आहे. भारत-न्यूझीलंडमध्ये नुकतीच वनडे मालिका झाली. ती संपल्यानंतर ही रँकिंग प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांत कर्णधार शुभमन गिल खेळला नाही. मात्र, तरीही रँकिंगमध्ये त्याचे अव्वल स्थान कायम आहे. त्याची रेटिंग ८०६ आहे. न्यूझीलंडचा डेरिल मिचेल हा ७७८ रेटिंगसह दुसऱ्या स्थानी आहे.

विराट कोहली तिसऱ्या स्थानी, जादरानला फायदा

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या तिसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने एकच अर्धशतकी खेळी केली होती. त्याचे रेटिंग ७५७ आहे. अफगाणिस्तानच्या इब्राहिम जादरान याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो चौथ्या स्थानी विराजमान झाला आहे. त्याची रेटिंग ७५२ आहे.

माजी कर्णधार रोहित शर्मा याला एका स्थानाचं नुकसान झाले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याच्या बॅटमधून धावा निघू शकल्या नाहीत. दोन वेळा तर तो शून्यावर बाद झाला. त्याची रेटिंग ७३२ आहे. वेस्ट इंडीजचा कर्णधार शे होप हा सहाव्या स्थानी पोहोचला आहे. बेन डकेट हा ६९९ रेटिंगसह सातव्या स्थानी आहे.

वनडे रँकिंग जाहीर, रोहित शर्माला मोठा दणका
Ind vs NZ : श्रेयस, इशान किशन-अक्षर पटेल नाही... हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे खरे हिरो, गावसकरांनी थेट नावं सांगितली

बाबर आझम, जो रूट आणि मेंडिसला फायदा

पाकिस्तानचा बाबर आझम याला एका स्थानाने फायदा झाला आहे. इंग्लंडचा जो रूट यानं दोन स्थानांची झेप घेतली आहे. श्रीलंकेचा कुसल मेंडिस याचा दोन स्थानांनी फायदा झाला आहे. तो दहाव्या स्थानी विराजमान झाला आहे. टॉम बॅटन यानं ३४ स्थानांनी झेप घेतली असून, तो थेट १३ व्या स्थानी पोहोचला आहे. त्याची रेटिंग ६२८ इतकी आहे.

वनडे रँकिंग जाहीर, रोहित शर्माला मोठा दणका
Suryakumar Yadav : 283 चा स्ट्राइक रेट, १६ चौकार-षटकार; सूर्याचं वादळ, धावांचा मुसळधार पाऊस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.