
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. या स्पर्धेची घोषणा झाल्यापासून एकापाठोपाठ एक वाद सुरुच आहेत. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताचे सामने हे दुबईत खेळवले जाणार आहेत. सामन्याच्या ठिकाणाचा वाद मिटल्यानंतर आता जर्सीवर असलेल्या नावावरुन नवा वाद पेटला आहे.
आयसीसीच्या स्पर्धेचे आयोजन ज्या देशात केले जाते, त्या देशाचे नाव जर्सीवर असते. नियमानुसार, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्व संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव असेल. मात्र बीसीसीआयने भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव टाकण्यास विरोध केला आहे. बीसीसीआयने विरोध केल्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्डने बीसीसीआयवर आरोप केले आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या अधिकाऱ्याने म्हटले की, ' बीसीसीआय क्रिकेटमध्ये राजकारण आणत आहे, जे खेळांच्या दृष्टीने योग्य नाही. बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास नकार दिला. ते ओपनिंग सेरेमनीच्या कार्यक्रमाला आपल्या कर्णधाराला पाकिस्तानात पाठवणार नाहीये. आता माध्यमातील वृत्तानुसार, भारतीय संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव नसेल. आम्ही आशा करतो की, ते असं होऊ देणार नाहीत आणि आयसीसी आम्हाला सपोर्ट करेल. '
यापूर्वी आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार भारतात खेळवला गेला होता. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. पाकिस्तानते सर्व सामने भारतात खेळवले गेले होते. यासह पाकिस्तानच्या जर्सीवर यजमान भारतीय संघाचे नाव देखील होते. आता भारतीय संघाला भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचंन नाव नको आहे.
आता आयसीसी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या स्पर्धेला येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध होणार आहे. तर दुसरा सामना २३ फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.