
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर शानदार विजयाची नोंद केली. यासह तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या जेतेपदाची ट्रॉफी उंचावली.
या स्पर्धेतील फायनलमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने ७६ धावांची शानदार खेळी केली. तर श्रेयस अय्यर आणि विराट कोहलीनेही फलंदाजीत योगदान दिलं. या शानदार कामगिरीचा या तिन्ही फलंदाजांना आयसीसीच्या रँकिंगमध्ये चांगलाच फायदा झाला आहे.
या स्पर्धेत भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. या संपूर्ण स्पर्धेत त्याने २१८ धावा केल्या. या फलंदाजीचा फायदा त्याला आयसीसीच्या रँकिंगमध्येही झाला आहे. विराट या रँकिंगमध्ये चौथ्या स्थानी जाऊन पोहोचला आहे. तर रोहितची मोठी घसरण झाली आह. तो आता पाचव्या स्थानी जाऊन पोहोचला आहे. तर भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा अव्वल स्थानी कायम आहे. या स्पर्धेत भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज श्रेयस अय्यर या यादीत आठव्या स्थानी जाऊन पोहोचला आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि मोहम्मद शमी यांच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. या स्पर्धेत गोलंदाजी करताना शमी आणि वरुणने मिळून १८ गडी बाद केले. आयसीसीच्या गोलंदाजांच्या यादीत केवळ १ भारतीय गोलंदाजाचा समावेश आहे. कुलदीप यादवची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ११ व्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. तर आपली पहिलीच आयसीसी स्पर्धा खेळणाऱ्या वरुण चक्रवर्तीने मोठी झेप घेत आयसीसीच्या टॉप १०० गोलंदाजांच्या यादीत प्रवेश केला आहे.
भारताचा संघ अव्वल स्थानी कायम आहे. यापूर्वीही भारताचा संघ वनडे क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी होता. भारतीय संघाची रेटींग ही १२२ इतकी आहे. तर ११० रेटींग पॉईंट्ससह ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. तर न्यूझीलंडचा संघ चौथ्या आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ पाचव्या स्थानी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.