ICC Champions Trophy : चॅम्पियन ट्रॉफीत चमकली टीम इंडिया; आनंदात विराट आणि रोहितचा स्टंप हातात घेऊन दांडिया, VIDEO

rohit sharma and virat kohli celebration : चॅम्पियन ट्रॉफीत चमकदार कामगिरी करत जेतेपद मिळवलं. त्यानंतर आनंदात विराट कोहली आणि रोहित शर्माने स्टंपने दांडिया खेळला.
rohit sharma and virat kohli celebration
ICC Champions Trophy Saam tv
Published On

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघाने न्यूझीलंडला धूळ चारली. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाने १२ वर्षांनी जेतेपद मिळवलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडियावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. टीम इंडिया चॅम्पियन्स ठरल्यानंतर विराट आणि रोहित शर्मानेही अनोखं सेलिब्रेशन केलं. विराट कोहली आणि रोहित शर्माने दांडिया खेळत सेलिब्रेश केलं. दोघांचा दांडिया खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

rohit sharma and virat kohli celebration
Cricketers Retirement: चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू असताना ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

टीम इंडियाने न्यूझीलंडला धूळ चारत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला चार गडी राखून पराभूत केले. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला २५२ धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र, ४९ षटकाच्या शेवटच्या बॉलवर टीम इंडिया सामना खिशात टाकला.

टीम इंडियाच्या विजयासाठी रोहित शर्माने चांगली कामगिरी केली. कर्णधार रोहित शर्माने ७६ धावांची खेळी खेळली. टीम इंडियाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला.

rohit sharma and virat kohli celebration
Virat Kohli Record: विराटचा नाद करायचा नाय... ICC च्या स्पर्धेत हा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील एकमेव फलंदाज

व्हिडिओमध्ये काय आहे?

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू आनंदात आहे. टीम इंडियाचे खेळाडू एकमेकांचं अभिनंदन करत आहे. खेळाडू एकमेकांना आलिंगन करत शुभेच्छा देत आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मानेही अनोख सेलिब्रेशन केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने स्टंपने दांडिया केला. दोघांनी हसत हसत दांडिया केला. दोघांच्या अनोख्या जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दोघांच्या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. अनेक युजर्सने हा व्हिडिओ शेअर केला आहे. अनेक चाहते कमेंट करत त्यांचं कौतुक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com