Rohit Sharma: दिलदार हिटमॅन! हार्दिक-सूर्या-बुमराहसाठी रोहित शर्माने दिली कोटींची कुर्बानी, निर्णयाने तुम्हीही भारावून जाल!

Rohit Sharma: मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांना रिटेन केलंय. चाहत्यांना रोहितला सर्वाधिक रक्कम देऊन पहिल्या क्रमांकावर पाहणं अपेक्षित होतं.
Rohit Sharma
Rohit Sharmasaam tv
Published On

आयपीएल २०२५ साठीच्या मेगा ऑक्शनपूर्वी गुरुवारी सर्व फ्रेंचाइजींनी त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवली आहे. यावेळी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांना रिटेन केलंय. यामध्ये मुंबईच्या टीमने सर्वात जास्त पैसे जसप्रीत बुमराहसाठी मोजले आहेत. तर या यादीत रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. मुळात चाहत्यांना रोहितला सर्वाधिक रक्कम देऊन पहिल्या क्रमांकावर पाहणं अपेक्षित होतं. मात्र तसं झालं नाही.

पहिल्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह (१८ कोटी रुपये), दुसऱ्या क्रमांकावर भारतीय टी-२० टीमचा कर्णधार सूर्यकुमार यादव (१६.३५ कोटी), तिसऱ्या क्रमांकावर हार्दिक पांड्या (१६.३५ कोटी) आणि चौथ्या क्रमांकावर रोहित शर्मा 16.30 कोटी) आणि शेवटचा क्रमांक तिलक वर्मा (रु. 8 कोटी) चा आहे. मात्र स्वतःला चौथ्या क्रमांकावर ठेवण्याचा निर्णय रोहित शर्माचा असल्याचं समोर आलं आहे.

Rohit Sharma
IPL 2025 Purse Update : आयपीएल मेगालिलाव होणार, पण कोणत्या संघाकडे किती पैसे उरले? सर्वाधिक फायदा कुणाला होणार?

बुमराह, सूर्या, हार्दिकला अधिक पैसे मिळावे- रोहित

एका न्यूज वेबसाईटला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी तरुण खेळाडूंना संधी मिळावी, अशी रोहित शर्माची इच्छा होती. त्याचप्रमाणे, या खेळाडूंना रोहितपेक्षा जास्त पैसे द्यायला हवे असंही रोहितचं म्हणणं होतं. याशिवाय त्याने दुसरा निर्णय घेतला आहे, ज्याची अपेक्षा क्वचितच कोणी केली असेल. आगामी आयपीएल 2025 सिझनमध्ये हार्दिक टीमच नेतृत्व करेल. सूत्रांच्या माहितीनुसार, हार्दिक पांड्याला कर्णधारपदी कायम ठेवण्याच्या निर्णयामागे रोहित शर्माचा हात आहे.

रिटेंशनवर आकाश अंबानी काय म्हणाले?

मुंबई इंडियन्सचे ओनर आकाश अंबानी यांनी त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटलंय की, कुटुंबाची ताकद तिच्या मजबूतीमध्ये असते यावर आमचा नेहमीच विश्वास आहे. नुकत्याच घडलेल्या घटनांमुळे आमचा हा विश्वास आणखी दृढ झालाय. जसप्रीत, सूर्या, हार्दिक, रोहित आणि तिलक सारखे खेळाडू मुंबई इंडियन्सचा वारसा पुढे नेतील याचा आम्हाला आनंद आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma: मी निवृत्ती घेतलीये...; मुंबईने रिटेन केल्यानंतर खूश आहे रोहित शर्मा, पाहा काय म्हणतोय हिटमॅन!

मुंबईचा कर्णधार कोण?

आगामी सिझनपूर्वी चाहत्यांच्या मनात एक प्रश्न होता. तो म्हणजे मुंबई इंडियन्सचा कर्णधार कोण असणार. रिटेन्शनच्या लिस्टसोबत मुंबई इंडियन्सने पुढच्या सिझनसाठी कर्णधाराचं नावही जाहीर केलं आहे. IPL 2025 मध्ये हार्दिक पांड्या टीमचा कर्णधार असणार आहे. गेल्या सिझनमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई टीमची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. मात्र मुंबईने पंड्यावरील विश्वास कायम ठेवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com