इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 हंगामासाठी रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. आज रविवारी १० संघाने त्यांच्या खेळाडूंना रिटेन आणि रिलीझ केलं. तर आज गुजरात टायटन्सने हार्दिक पंड्याला रिटेन केलं. त्यानंतर काही तासातच हार्दिकची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री झाली, असं वृत्त Cricbuzzने दिलं आहे. (Latest Marathi News)
यंदा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात हार्दिक पंडया खेळताना दिसणार आहे. गुजरात टायटन्स संघ २०२२ मध्ये नव्याने आयपीएलच्या स्पर्धेत उतरला होता. त्यावेळी पंड्या गुजरातचा कर्णधार होता. त्यावेळी गुजरात संघाने हार्दिक पंड्याला १५ कोटी रुपयांचं मानधन दिलं होतं. पंड्याच्या नेतृत्वात गुजरातने आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. तर याआधी हार्दिक मुंबईसाठीच खेळत होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुंबई इंडियन्सकडे हार्दिक पंड्याला संघात स्थान देण्यासाठी पैसेही उपलब्ध नव्हते. त्यामुळे मुंबईने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीनला रिलीझ केलं. आता ग्रीन रॉयल चॅलेंज बेंगळुरु संघासाठी खेळण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आतापर्यंत आयपीएलचे १२३ सामने खेळले आहेत. त्यात हार्दिकने ११५ डावात २३०९ धावा कुटल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये १० अर्धशतके ठोकली आहेत. हार्दिक पंड्याने ८१ डावात गोलंदाजी केली आहे. तर या डावात हार्दिकने ५३ गडी बाद केले आहे. त्याने एका डावात १७ धावा देऊन ३ गडी बाद करत कमाल केली होती.
गुजरातने रिटेन केल्यानंतर अवघ्या २ तासातच मुंबई इंडियान्सने हार्दिक पंड्याला संघात स्थान दिलं. दुसरीकडे गुजरात संघाने त्यांच्या ८ खेळाडूंना रिलीझ केलं आहे. या खेळाडूमध्ये यश दयाल, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, ओडियन स्मिथ, अल्जारी जोसेफ आणि दासुन सनाका यांचा सामावेश आहे
मुंबई इंडियन्सने ११ खेळाडूंना रिलीझ केलं. यामध्ये अरशद खान, रमनदीप सिंह, ऋतिक शौकीन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन जानसेन, झे रिचर्ड्सन, रिले मेरेडिथ, क्रिस जॉर्डन आणि संदीप वॉरियर यांचा सामावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.