Hardik Pandya Century: 6, 6, 6, 6, 6, 4; 6 चेंडूत ठोकल्या 34 धावा; हार्दिक पांड्याचं वेगवान शतक| पाहा Video

Hardik Pandya’s Fastest Century Video Watch: हार्दिक पांड्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये अवघ्या ६ चेंडूत ३४ धावा करत शानदार शतक झळकावलं. त्याची फलंदाजी पाहून अनेकजण चकित झाले.
Hardik Pandya Century
Hardik Pandya’s Fastest Century Video Watchsaam tv
Published On
Summary
  • विजय हजारे ट्रॉफीमध्ये हार्दिक पांड्याचं वादळी शतक

  • 6 चेंडूत 34 धावा; सलग षटकारांनी स्टेडियम हादरलं

  • बडोद्याचे फलंदाज अडचणीत असताना हार्दिकचा एकहाती डाव

हार्दिक पांड्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा आपल्या धमाकेदार खेळीनं अनेकांना आर्श्चचकित केलंय. सहा चेंडूत ३४ धावा ठोकत हार्दिकनं वेगवान शतक केलं. विजय हजारे ट्रॉफीमध्ये बडोद्याकडून खेळताना हार्दिकने विदर्भाविरुद्ध तुफानी शतक झळकावलं. राजकोटमधील खांदेरी येथील निरंजन शाह स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हार्दिक पांड्याने वादळी शतक केलं. या सामन्यात बडोद्याचे इतर फलंदाज अडचणीत असताना हार्दिकने एकहाती डाव सावरत संघाला सन्मानजनक स्थितीत नेलं.

Hardik Pandya Century
6,6,6,6,6,6....दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा फलंदाजाची वादळी खेळी, VIDEO

डावाच्या सुरुवातीला हार्दिकने संयम राखत फलंदाजी केली. ४४ चेंडूमध्ये त्याने पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर त्याने आपल्या फलंदाजीची लय बदलली. ३८ व्या षटकापर्यंत हार्दिक ६६ धावांवर होता. त्याने विदर्भाच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने ५ षटकार आणि १ चौकार ठोकला. अवघ्या सहा चेंडूंमध्ये हार्दिकने ३४ धावा काढत आपले शतक पूर्ण केलं.

हार्दिकने ६८ चेंडूंमध्ये हे शतक झळकावले. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर हा त्याचा पहिलाच ५० षटकांचा स्थानिक सामना होता. या पहिल्याच डावात त्याने आपली कमाल दाखवली या डावात हार्दिकने एकूण ८षटकार आणि ४ चौकार मारले. हार्दिकनं १४३ च्या पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.

Hardik Pandya Century
Team India: T20 वर्ल्ड कपपासून ते न्यूझीलंडची टूर...; 2026 मध्ये टीम इंडियाचं शेड्यूल टाइट, पाहा कधी आणि कोणासोबत खेळणार?

हे शतक हार्दिक पांड्याच्या कारकिर्दीतील पहिले लिस्ट ‘ए’ शतक ठरले. आतापर्यंत ११९ लिस्ट ‘ए’ सामने खेळलेल्या हार्दिकने २३५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने १३ अर्धशतके झळकावली आहेत. भारतीय संघाच्या निवडीआधी त्याने त्याची शानदार खेळी निवडकर्त्यांसाठी जोरदार संदेशच ठरला आहे. क्रिकेट वेबसाइट क्रिकबझच्या वृत्तानुसार, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळणार नाहीत. दोन्ही खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्याचे वृत्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com