Watch Video: पॅट कमिन्सचं बोट पाहून घाबरले हार्दिक-सूर्या; किस्सा ऐकून बसला धक्का

Pat Cummins: मुंबई इंडियन्ससोबत झालेल्या सामन्यात कमिन्सच्या नेतृत्वखाली खेळणाऱ्या हैदराबादच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना झाल्यानंतर हार्दिक आणि सूर्यकुमार यादवने पॅट कमिन्सशी चर्चा केली. त्यावेळी कमिन्सने त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एक किस्सा सांगितला. त्यावेळी सूर्यकुमार आणि कर्णधार हार्दिक पांड्याला धक्का बसला.
Pat Cummins
Pat Cummins

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियासाठी दोन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा कर्णधार पॅट कमिन्स सध्या आयपीएल २०२४ मध्ये आपली छाप पाडत आहे. पण कमिन्स अँड त्यांच्या हैदराबादच्या संघाला मुंबईविरुद्ध पराभवाला सामोरे जावं लागलं. पण सामन्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात कमिन्सचे बोट पाहून सूर्यकुमार यादव आणि मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या आश्चर्यचकित झाले. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत आहेत.

पॅट कमिन्स लहानपणी एका अपघाताचा बळी ठरला होता. त्यामुळे त्याच्या एका हाताचं मधलं बोट तुटलं होतं. मुंबई आणि हैद्राबाद यांच्यातील सामन्यानंतर हार्दिक आणि सूर्याने कमिन्सचं बोट कसं कापलं गेलं याची माहिती घेतली त्यावेळी दोघांना मोठा धक्का बसला. तर कर्णधार पांड्याने घाबरुन तोंडाला हात लावलीत. दरम्यान पॅट कमिन्सने हे बोट कसलं तुटलं होतं याची माहिती ऑस्ट्रेलियासाठी डेब्यू करताना दिलं होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com