India vs Pakistan World Cup 2023: बाबरला विराटपेक्षा श्रेष्ठ म्हणणाऱ्या शोएब अख्तरची हरभजनने लायकीच काढली; म्हणाला..

Hajrbhajan Singh: विराट कोहली यांच्यात श्रेष्ठ कोण? यावर देखील अनेक दिग्गज आपली प्रतिक्रिया देताना दिसुन येत आहे.
harbhajan singh
harbhajan singh saam tv
Published On: 

Harbhajan Singh Shoaib Akhtar: आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार यावेळी भारतात रंगणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआय आणि आयसीसीने वेळापत्रकाची घोषणा देखील केली आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारत - पाकिस्तान सामना येत्या १५ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे.

हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. या सामन्याची घोषणा होताच एकच चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे की, हा सामना कोण जिंकणार. तसेच बाबर आझम आणि विराट कोहली यांच्यात श्रेष्ठ कोण? यावर देखील अनेक दिग्गज आपली प्रतिक्रिया देताना दिसुन येत आहे.

harbhajan singh
ODI WC 2023: पाकिस्तानला भारतात यावच लागेल! नकार देणाऱ्या PCB ची ICC ने मोजक्या शब्दात चांगलीच जिरवली

नुकताच हरभजन सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. ज्यात तो पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर सोबत असल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान हरभजन सिंग शोएब अख्तरला विचारतो की, विराट कोहली आणि बाबर आझम यांच्यापैकी श्रेष्ठ कोण?

या प्रश्नाचं उत्तर देत शोएब अख्तरने विराट कोहलीला श्रेष्ठ म्हटले आहे. तर बाबर आझम श्रेष्ठ बनण्याच्या वाटेवर आहे. असं शोएब अख्तर म्हणताच हरभजन सिंगने मौक्यावर चौका मारत बाबर आझमचा अपमान करतो. भज्जी म्हणतो की, बाबर आझम चांगलाच खेळाडू आहे, मात्र कसोटी क्रिकेटचा. तो टी -२० फॉरमॅटमध्ये सूट करत नाही. टी-२० क्रिकेटमध्ये तो संथ गतीने फलंदाजी करतो. हे ऐकताब बाबर आझम थोडा वेळ थांबला आणि म्हणाला की, तो लवकरच स्वतःमध्ये सुधारणा करेल. (Latest sports updates)

harbhajan singh
ICC ODI WC 2023 Schedule: लागा तयारीला! ICC वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; या दिवशी रंगणार भारत- पाकिस्तान सामना

वर्ल्ड कप स्पर्धेत रंगणार भारत- पाकिस्तान सामना..

आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. भारत -पाकिस्तान सामना येत्या १५ ऑक्टोबर रोजी, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. तर स्पर्धेची सुरुवात ५ ऑक्टोबरपासून इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होणार आहे. ४६ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ४८ सामने खेळवले जाणार आहेत. हे सर्व सामने भारतातील १० मैदानांवर खेळवले जाणार आहेत.

harbhajan singh
Team India Players Comeback: निवृत्तीच्या वाटेवर असलेले 'हे' ३ खेळाडू वर्ल्ड कप खेळणार! BCCI देऊ शकते सरप्राईज एंट्री

असे आहेत भारतीय संघाचे सामने..

८ ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई

११ ऑक्टोबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली

१५ ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद

१९ ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे

२२ ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला

२९ ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड, लखनौ

२ नोव्हेंबर - भारत विरुद्ध क्वालिफायर, मुंबई

५ नोव्हेंबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता

११ नोव्हेंबर - भारत विरुद्ध क्वालिफायर, बंगळुरू (ICC ODI WC 2023 Time Table)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com