Rashid Khan Record: IPLमध्ये राशिद खानने रचला इतिहास! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच गोलंदाज

Rashid Khan Record In IPL: गुजरात टायटन्स संघातील अनुभवी गोलंदाज राशिद खानने पहिल्याच सामन्यात मोठ्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे.
Rashid Khan Record: IPLमध्ये राशिद खानने रचला इतिहास! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच गोलंदाज
rashid khantwitter
Published On

आयपीएल २०२५ स्पर्धेतील पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा दोन्ही संघांचा या हंगामातील पहिलाच सामना होता. या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान प्रथम गोलंदाजी करणाऱ्या गुजरातकडून राशिद खानने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Rashid Khan Record: IPLमध्ये राशिद खानने रचला इतिहास! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच गोलंदाज
IPL 2025 Points Table: गुणतालिकेत मोठी उलटफेर; लखनौचा धुव्वा उडवल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची Points Tableमध्ये भरारी

या सामन्यात गोलंदाजीला येण्यापूर्वी राशिद खानला आयपीएल स्पर्धेत १५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी १ विकेट घ्यायचा होता. या डावात गोलंदाजीला येताच त्याने विस्फोटक फलंदाज प्रियांश आर्यला बाद केलं. प्रियांश राशिद खानच्या गोलंदाजीवर बाद होणारा १५० वा फलंदाज ठरला. यासह राशिद खानने आपल्या आयपीएल कारकिर्दीतत १५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत.

Rashid Khan Record: IPLमध्ये राशिद खानने रचला इतिहास! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच गोलंदाज
DC vs LSG IPL 2025: 'इम्पॅट' प्लेअर ठरला 'हिरो'; आशुतोष शर्मानं धमाकेदार फलंदाजी करत लखनौला नमवलं

हरभजन सिंगची केली बरोबरी

राशिद खानने हा सामना खेळण्यापूर्वी १२१ सामने खेळले होते. यादरम्यान त्याने २१.८२ च्या सरासरीने १४९ गडी बाद केले होते. यादरम्यान ४ गडी बाद २४ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. आतापर्यंत त्याने २ वेळेस ४ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. या सामन्यात १५० विकेट्स पूर्ण करताच त्याने हरभजन सिंगच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. हरभजन सिंगनेही आपल्या आयपीएल कारकिर्दीत १५० विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.

Rashid Khan Record: IPLमध्ये राशिद खानने रचला इतिहास! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच गोलंदाज
DC vs LSG, IPL 2025: केएल राहुलशिवाय दिल्लीचा संघ मैदानात; प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग ११

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज

राशिद खान टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. राशिद खानच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ४६२ टी-२० सामन्यांमध्ये ६३४ विकेट्स घेतल्या आहेत. हा कारनामा त्याने १० वर्षात केला आहे. राशिद खान अवघ्या २६ वर्षांचा आहे. तो आणखी काही वर्ष टी-२० क्रिकेट खेळू शकतो. त्यामुळे त्याच्याकडे १००० विकेट्स घेण्याची संधी असणार आहे. येणाऱ्या काही वर्षात त्याने अशीच कामगिरी सुरु ठेवली, तर तो लवकरच १००० विकेट्स घेण्याचा कारनामा करु शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com