BCCI News: जा अन् रणजी खेळ! कसोटीत फ्लॉप शो देणाऱ्या खेळाडूला बीसीसीआयचा इशारा

Rajat Patidar News : पाटीदारला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मिळालेल्या संधीचं सदुपयोग करता आलेला नाहीये. सहा डावांमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ३२ अशी आहे. तो दोनवेळा शुन्य धाव संख्येवर बाद झालाय. पाटीदार मधल्या फळीतील फलंदाज आहे.
Rajat Patidar
Rajat Patidar BCCI
Published On

Bcci Warns Rajat Patidar Patidar :

भारत आणि इंग्लंडच्या संघात पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना धर्मशाळेतील मैदानात होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ निश्चित झालाय. मात्र दोन खेळाडूंवर अजून निर्णय अद्याप झालेला आहे. के. एल. राहुल आणि रजत पाटीदार याच्याबाबत अजून कोणताच निर्णय झालेला नाहीये. मागील कसोटी सामन्यांमध्ये पाटीदार फ्लॉप ठरलाय. पाटीदारच्या फ्लॉप शोमुळे बीसीसीआयने तंबी देते त्याला रणजी खेळण्याचा सल्ला दिलाय. (Latest News)

तर के. एल. राहुल (Kl Rahul) अजून तंदुरुस्त झालेला नाहीये. यामुळे भारतीय संघ (Team India) चिंतेत पडलाय. कोणता खेळाडू पाचवा कसोटी सामना (Test Match) खेळेल हा प्रश्न संघासमोर पडलाय. त्यात पाटीदारच्या कामगिरीमुळे संघाही चिंतेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुलला त्याच्या उजव्या क्वाड्रिसेप्समध्ये त्रास होत असल्याने तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी तो लंडनला गेलाय. दुखापतीमुळे तो इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता. यामुळे संघ निवडकर्ते २ मार्चला निर्णय घेतला जाणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धर्मशाळेला जाण्यापूर्वी आदल्या दिवशी खेळाडूंना चार्टर्ड फ्लाइटने चंदीगडमध्ये एकत्र व्हावे लागणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी बीसीसीआयच्या (BCCI) प्रसिद्धीपत्रकानुसार "९०% तंदुरुस्त" असलेल्या राहुलने तोपर्यंत पूर्ण तंदुरुस्ती मिळवली नाही, तर निवडकर्त्यांना रजत पाटीदारला संघात ठेवावे लागेल. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार निवडकर्त्यांना पाटीदारला भारताच्या कसोटी संघातून मुक्त करायचे आहे. जेणेकरून तो २ मार्च रोजी मध्य प्रदेशसाठी विदर्भाविरुद्ध रणजी ट्रॉफीचा सेमी फायनल सामना खेळू शकेल.

दरम्यान पाटीदारला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मिळालेल्या संधीचं सदुपयोग करता आलेला नाहीये. सहा डावांमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ३२ अशी आहे. तो दोनवेळा शुन्य धाव संख्येवर बाद झालाय. पाटीदार मधल्या फळीतील फलंदाज आहे. त्याला चौथ्या क्रमांकावर तो उत्तम फलंदाजी करतो. परंतु त्या क्रमांकावर येऊनही त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाहीये. यामुळे संघ निवडकर्त्यांची चिंता वाढलीय. त्यामुळे जर राहुलने तंदुरुस्त झाला तर पाटीदाला बाहेरचा दाखवला जाईल. सरळ म्हणायचं म्हटलं तर पाटीदार माघारी जात रणजी क्रिकेट खेळून आपला फॉर्म वापस आणावा, अस संघ व्यवस्थापनाला वाटत आहे.

Rajat Patidar
Ranji Trophy: टीम इंडियाच्या एकेकाळच्या कर्णधारावर रणजी संघातूनही बाहेर पडण्याची वेळ, ३ वर्षांत असं काय अप्रिय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com