भारतीय क्रिकेटमध्ये एक काळ असा होता जेव्हा अजिंक्य रहाणेकडे भारतीय कसोटी संघाचा यशस्वी कर्णधार म्हणून पाहिलं जायचं. विराट कोहली, रोहित शर्मासारख्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत त्याने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन पराभूत करण्याचा कारनामा केला होता. २०२०-२१ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला असताना,पहिला कसोटी सामना झाल्यानंतर विराट कोहली वैयक्तिक कारणास्तव माघारी परतला होता. त्यानंतर पुढील सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणे हा भारतीय संघाचा कर्णधार होता. भारताला ऐतिहासीक विजय मिळवून देणाऱ्या अजिंक्य रहाणेला भारतीय संघात स्थान मिळवणंही कठीण झालं आहे.
अजिंक्य रहाणेचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला भारतीय संघात सोडा, रणजी संघात स्थान टिकवून ठेवणंही कठीण झालं आहे. सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत तो मुंबईचं नेतृत्व करतोय. मुंबई संघाने शानदार कामगिरी करत स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र अजिंक्य रहाणेची बॅट अजूनही शांत आहे.
रणजी ट्रॉफी स्पर्धेत पूर्णपणे फ्लॉप..
अजिंक्य रहाणेला रणजी ट्रॉफी स्पर्धेतील या हंगामात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्याचा गेल्या १० डावातील रेकॉर्ड पाहिला तर त्याला ०,०,१६,८,९,१,५६,२२,३ आणि ० धावा करता आल्या आहेत. म्हणजे त्याला गेल्या १० डावात अवघ्या ११५ धावा करता आल्या आहेत. मुख्य बाब म्हणजे मुंबईकडून १० व्या क्रमांकावर खेळणाऱ्या तुषार देशपांडेने त्याला एकाच डावात मागे सोडलं आहे.
बडोदाविरुद्धच्या सामन्यात तुषाक देशपांडेने १२३ धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणे मुंबईचा कर्णधार आहे. म्हणून तो या संघात टिकून आहे. जर कर्णधार नसता तर त्याला कधीच बाहेर केलं गेलं असतं. चिंता वाढवणारी बातमी म्हणजे त्याने असाच खेळ सुरु ठेवला तर त्याचं भारतीय संघात कमबॅक करणं कठीण आहे. (Cricketv news marathi)
१०० कसोटी सामने खेळण्याचं स्वप्न अपूर्ण राहणार?
अजिंक्य रहाणेने आतापर्यंत भारतीय संघासाठी ८५ कसोटी सामने खेळले आहेत .त्याला १०० कसोटी सामने पूर्ण करण्यासाठी अजूनही १५ सामने खेळायचे आहेत. मात्र त्याचा हा फॉर्म पाहता त्याला संघात स्थान मिळणं कठीण आहे. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ३९ पेक्षाही कमीच्या सरासरीने धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १२ शतकं आणि २६ अर्धशतकं झळकावली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.