Gautam Gambhir: 'पाया पडलो नव्हतो, म्हणून...', निवडकर्त्यांबाबत गौतम गंभीरचा धक्कादायक खुलासा

Gautam Gambhir News In Marathi: भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने निवडकर्त्यांबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
Gautam Gambhir: 'पाया पडलो नव्हतो, म्हणून...', निवडकर्त्यांबाबत गौतम गंभीरचा धक्कादायक खुलासा
gautam gambhir big reveleation on selectors said i did not selected because i did not touch the feet amd2000twitter

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकप २००७ आणि वनडे वर्ल्डकप २०११ स्पर्धा जिंकून देण्यात मोलाची भुमिका बजावली. आपल्या कारकिर्दीत त्याने अनेकदा महत्वाची खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. यादरम्यान अनेक वाईट गोष्टीही घडल्या. याबाबत गंभीरने मोठा खुलासा केला आहे.

गौतम गंभीरने आर अश्विनसोबत एका चर्चेत सहभाग घेतला होता. या चर्चेत त्याने संघात निवड न होण्याबाबत मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला की,' जेव्हा मी मोठा होत होतो. मी १२- १३ वर्षांचा असेल. त्यावेळी मी अंडर १४ स्पर्धेसाठी पहिल्यांदा ट्रायल्स दिले होते. त्यावेळी माझी निवड झाली नव्हती. कारण मी निवडकर्त्यांच्या पाया पडलो नव्हतो. त्यावेळीच मी ठरवलं होतं की, यापुढे कोणाच्या पाया पडायच्या नाही आणि कोणाला पाया पडू द्याचच्या नाही.'

Gautam Gambhir: 'पाया पडलो नव्हतो, म्हणून...', निवडकर्त्यांबाबत गौतम गंभीरचा धक्कादायक खुलासा
IPL Playoffs, Qualifier 1: पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणाला मिळणार फायनलचं तिकीट?

गंभीरने पुढे सांगितलं की, जेव्हा जेव्हा त्याची वैयक्तिक कामगिरी निराशाजनक असायची त्यावेळी कुटुंबाचा उल्लेख करुन त्याच्यावर दबाव टाकला जायचा. याबाबत बोलताना तो म्हणाला की, ' मला अजूनही आठवतंय, जेव्हा माझी वैयक्तिक कामगिरी निराशाजनक असायची त्यावेळी लोकं मला म्हणायचे की, तू चांगल्या कुटुंबातून आहेस, तुला क्रिकेट खेळायची गरज नाही. तुझ्याकडे खुप पर्याय आहेत. तू वडिलांचा बिझनेस सांभाळू शकतोस.' ही लोकांची धारणा होती. पण क्रिकेट खेळणं जास्त महत्वाचं होतं, असं गंभीर म्हणाला.

Gautam Gambhir: 'पाया पडलो नव्हतो, म्हणून...', निवडकर्त्यांबाबत गौतम गंभीरचा धक्कादायक खुलासा
IPL 2024, KKR vs SRH: कोलकाता की हैदराबाद; कोणाला मिळणार फायनलचं तिकीट? पाहा प्लेऑफमध्ये दोन्ही संघांचा रेकॉर्ड

गौतम गंभीर सध्या आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या मेटाँरची भुमिका पार पाडतोय. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने २०१२ मध्ये पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर २०१४ मध्ये दुसऱ्यांदा या संघाने जेतेपदाचा मान मिळवला. यावेळीही कोलकाता नाईट रायडर्स संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com