Gautam Gambhir Statement: तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या डिव्हिलियर्स अन् पीटरसनवर गंभीर भडकला

Gautam Gambhir On Ab De Villiers: डिव्हिलियर्स आणि पीटरसन यांनी हार्दिक पंड्यावर टीका केली होती. आता या टीकेवर गौतम गंभीरने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Gautam Gambhir Statement: तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या डिव्हिलियर्स अन् पीटरसनवर गंभीर भडकला
Gautam gambhir backs hardik pandya and slams kevin pietersen and ab de villiers over captaincy amd2000saam tv

आयपीएल २०२४ स्पर्धा ही मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्यासाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी राहिलेली नाही. या स्पर्धेच्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने त्याला आपल्या संघात स्थान दिलं. त्यानंतर रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवण्यात आली. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्स संघाचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. मुंबईने आतापर्यंत १३ सामने खेळले आहेत.

यादरम्यान मुंबई इंडियन्सने ४ सामने जिंकले आहेत. तर ९ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सुमार कामगिरीनंतर त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स आणि इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसनने त्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. आता गौतम गंभीर हार्दिक पंड्याला समर्थन करण्यासाठी मैदानात उतरला आहे.

स्पोर्ट्सकीडासोबत चर्चा करताना गौतम गंभीर म्हणाला की, ' जेव्हा तो कर्णधार होता त्यावेळी त्याची कामगिरी कशी होती? केविन पीटरसन असो किंवा मला नाही वाटत त्यांनी कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली असेल. जर तुम्ही त्यांचा रेकॉर्ड पाहाल, तर तुम्हाला जाणवेल की दोघंही नेतृत्वाच्या बाबतीत किती वाईट होते. वैयक्तिक धावा सोडल्या, तर मला वाटत नाही की, एबी डिव्हिलियर्सने आयपीएल स्पर्धेत वेगळं काही केलं असेल. हार्दिक पंड्या आयपीएल स्पर्धेत विजेत्या संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे मोसंबीची तुलना ही मोसंबीसोबतच केली गेली पाहिजे. सफरचंदाची तुलना मोसंबीसोबत केलेलं कसं चालेल.'

Gautam Gambhir Statement: तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या डिव्हिलियर्स अन् पीटरसनवर गंभीर भडकला
IPL 2024 Playoffs Prediction: लिहून घ्या! हेच ४ संघ करणार IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश

एबी डिव्हीलियर्सचा खुलासा

एबी डिव्हीलियर्सने काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाबाबत बोलताना म्हटले होते की, ' हार्दिक पंड्या खुप धाडसी आहे. त्याच्या नेतृत्वात अहंकार जाणवतो. मला तरी वाटतं की, त्याचं मैदानावरील चालणं प्रामाणिक असते. त्याने असं ठरवलंय की हीच माझ्या नेतृत्वाची पद्धत आहे.' आता एबी डिव्हीलियर्सने या वक्तव्यावर मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला की, 'माझं वक्तव्य तोडून मोडून सादर करण्यात आलं आहे. पत्रकारीतेचा दर्जा खूप खालावला आहे.'

Gautam Gambhir Statement: तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या डिव्हिलियर्स अन् पीटरसनवर गंभीर भडकला
IPL 2024 Betting News: आयपीएलच्या मॅचवर सट्टा; ३० जणांवर गुन्हे दाखल, दोन जण पोलिसांच्या ताब्यात

कोलकाता नाईट रायडर्सचा प्लेऑफमध्ये प्रवेश

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल २०२४ स्पर्धेतील प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. तर राजस्थान रॉयल्स हा आयपीएल स्पर्धेतील प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला आहे. तर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी सनरायझर्स हैदराबाद,चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com