

ICC ODI World Cup 2023 Prediction: आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धा सुरु व्हायला अवघे १०० दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेसाठी बीसीसीआय आणि आयसीसीने वेळापत्रकाची घोषणा केली आहे. येत्या ५ ऑक्टोबरपासून या स्पर्धेचा थरार सुरु होणार आहे.
स्पर्धेतील पहिला सामना गतविजेते इंग्लड आणि उपविजेते न्यूझीलंड संघामध्ये रंगणार आहे. या स्पर्धेचे आयोजन भारतात केले जाणार आहे.
त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.दरम्यान वेळापत्रकाची घोषणा होताच माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने टॉप ४ संघ कोणते असतील याची भविष्यवाणी केली आहे.
आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. या कार्यक्रमाला काही दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली होती. ज्यात माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा देखील समावेश होता.
काय म्हणाला वीरेंद्र सेहवाग?
या कार्यक्रमाच्या वेळी वीरेंद्र सेहवागला प्रश्न विचारला होता की, आगामी वनडे विश्वचषक स्पर्धेत सेमी फायनलमध्ये जाणारे ४ संघ कोणते? या प्रश्नाचे उत्तर देताना वीरेंद्र सेहवागने ४ संघाची नावे सांगितली आहेत.
ज्यात भारत, गतविजेते इंग्लंड, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या ४ संघांचा समावेश आहे. यावेळचा विश्वचषक भारतात रंगणार आहे, त्यामुळे भारतीय संघाला या स्पर्धेत विजय मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. (Latest sports updates)
असे आहेत भारतीय संघाचे सामने..
८ ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
११ ऑक्टोबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
१५ ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
१९ ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे
२२ ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
२९ ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड, लखनौ
२ नोव्हेंबर - भारत विरुद्ध क्वालिफायर, मुंबई
५ नोव्हेंबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
११ नोव्हेंबर - भारत विरुद्ध क्वालिफायर, बेंगळुरू (ICC ODI WC 2023 Time Table)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.