Vidarbha Cricket Association: आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. ही स्पर्धा सुरु व्हायला अवघे ९९ दिवस शिल्लक राहिले आहेत. मंगळवारी या स्पर्धेचं वेळापत्रक जाहिर करण्यात आलं आहे. १० संघांमध्ये ४८ सामने रंगणार आहेत.
यापैकी १० सामने हे महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या शहरात रंगणार आहेत. दरम्यान नागपुरच्या विदर्भ क्रिकेटअसोसिएशनच्या मैदानावर एकही सामना होणार नसल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे. (Anil Deshmukh)
विदर्भावर अन्याय..
आगामी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील २ ठिकाणं निवडली गेली आहेत. ज्यात मुंबई आणि पुणे या शहरांचा समावेश आहे. तर नागपूरमध्ये एकही सामना खेळवला जाणार नाही. याबाबत बोलताना अनिल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच नागपूरच्या मैदानावर एकतरी सामना खेळवण्यात यावा यासाठी बीसीसीआयला पत्र लिहणार असल्याचंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
याबाबत बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, 'आगामी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील एकही सामना नागपूरात खेळवला जाणार नाही. नागपूरात विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आहे. याठिकाणी विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथून प्रेक्षक सामना बघण्यासाठी येतात.
मात्र, एकिकडे वर्ल्ड कप स्पर्धेत पुण्यातील स्टेडियममध्ये ५ सामने खेळवले जात असताना विदर्भातील स्टेडियम मध्ये एकही सामना नाही. हा एकप्रकारे विदर्भावर अन्याय आहे, त्यामुळं विदर्भात वर्ल्ड कप स्पर्धेतील एकतरी सामना खेळवला जावा, यासाठी मी बीसीसीआयकडे पत्र लिहणार आहे.' (Latest sports updates)
पुण्यात ५ तर मुंबईत रंगणार ५ सामने..
आगामी वर्ल्ड कप स्पर्धेतील ९ सामने महाराष्ट्रात रंगणार आहे. यापैकी ५ सामने पुण्यात तर ४ सामने मुंबईत रंगणार आहेत.
पुण्यात होणारे सामने..
भारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, २०२३
अफगाणिस्तान विरुद्ध क्वालिफायर २- ३० ऑक्टोबर, २०२३
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका- १ नोव्हेंबर, २०२३
इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर १- ८ नोव्हेंबर, २०२३
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश - १२ नोव्हेंबर,२०२३
मुंबईत होणारे सामने..
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २१ ऑक्टोबर
दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, २४ ऑक्टोबर
भारत विरुद्ध क्वालिफायर २ - २ नोव्हेंबर
ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्थान - ७ नोव्हेंबर
सेमी फायनल १ - १५ नोव्हेंबर
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.