Graham Thorpe: कोण होते ग्रॅहम थॉर्प? सचिन- सेहवागसोबत आहे खास कनेक्शन

Graham Thorpe Death : इंग्लंडचे दिग्गज क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झाले आहे. दरम्यान त्यांचं सचिन आणि सेहवागसोबत खास कनेक्शन आहे.
Graham Thorpe: कोण होते ग्रॅहम थॉर्प? सचिन- सेहवागसोबत आहे खास कनेक्शन
graham thorpesaam tv
Published On

क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. इंग्लंडसाठी १०० हून अधिक कसोटी सामने खेळणाऱ्या दिग्गज फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झाले आहे. ग्रॅहम थॉर्प यांचं निधन का आणि कशामुळे झालं याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा केला जातोय की, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. ४ दिवसांपूर्वीच म्हणजेच १ ऑगस्ट रोजी त्यांनी आपला ५५ वा वाढदिवस साजरा केला होता. आता ४ दिवसांनंतर त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

ग्रॅहम थॉर्प यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी १९९३ मध्ये इंग्लंकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर शेवटचा सामना २००५ मध्ये खेळला. यादरम्यान त्यांना राहुल द्रविड, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागसारख्या दिग्गज खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्यांनी इंग्लंडसाठी १०० कसोटी सामने आणि ८२ वनडे सामने खेळले. यादरम्यान त्यांनी ६७४४ धावा केल्या. त्यांच्या नावे २१ अर्धशतकं झळकावण्याची नोंद आहे. यासह गोलंदाजी करताना त्यांनी २ गडी देखील बाद केले होते.

Graham Thorpe: कोण होते ग्रॅहम थॉर्प? सचिन- सेहवागसोबत आहे खास कनेक्शन
IND vs SL, 2nd ODI: टीम इंडियाने सामना कुठे गमावला? कोचने सांगितलं नेमकं कारण

ग्रॅहम थॉर्प यांना भारताविरुद्ध ५ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्यांनी प्रशिक्षणातही बहुमूल्य योगदान दिलं. ते २००५ मध्ये साऊथ वेल्सचे प्रशिक्षक होते. त्यानंतर त्यांनी इंग्लंड लायन्स संघालाही प्रशिक्षण दिलं. त्यांनी इंग्लंड संघालाही प्रशिक्षण दिलं. २०१३ मध्ये ते इंग्लंडच्या वनडे आणि टी-२० संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होते.त्यांच्या जाण्याने इंग्लंड क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.

Graham Thorpe: कोण होते ग्रॅहम थॉर्प? सचिन- सेहवागसोबत आहे खास कनेक्शन
IND vs SL,2nd ODI: टीम इंडियाची स्थिती 'गंभीर'; जेफ्री वँडर्सेचा विकेट्सचा षटकार, भारताचा दारुण पराभव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com