
दिल्ली कॅपिटल्सला आजवर एकदाही आयपीएलच्या जेतेपदाची ट्रॉफी उंचावता आलेली नाही. या संघाने फायनलपर्यंतचा पल्ला गाठलाय. मात्र या संघाला अजूनपर्यंत तरी आयपीएलची ट्रॉफी जिंकता आलेली नाही. आगामी हंगामासाठी झालेल्या लिलावापूर्वी दिल्लीने रिषभ पंतला रिलीझ करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला सोडल्यानंतर, केएल राहुल, फाफ डू प्लेसिससारख्या अनुभवी खेळाडूंना संघात स्थान दिलं.
त्यावेळी वाटलं होतं की, कर्णधारपदाची जबाबदारी यंदा राहुलच्या खांद्यावर असेल, मात्र राहुलने ही जबाबदारी स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार कळवला होता. त्यामुळे ही जबाबदारी अक्षर पटेलकडे सोपवण्याचा निर्णय देण्यात आला आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी फाफ डू प्लेसिसकडे सोपवण्यात आली आहे.
दिल्ली कॅपिटल्सकडे फाफ डू प्लेसिस आणि केएल राहुलसारखे अनुभवी खेळाडू आहेत. मात्र मॅनेजमेंटने ही जबाबदारी युवा खेळाडू अक्षर पटेलकडे सोपवण्यात आली आहे. तर त्याला अनुभवाची जोड देण्यासाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी फाफ डू प्लेसिसकडे सोपवली गेली आहे.
ही दिल्ली कॅपिटल्ससाठी अतिशय आनंदाची बाब आहे. कारण दिल्लीलाही अनुभवी खेळाडूची गरज होती. फाफला नेतृत्वाचा दांडगा अनुभव आहे. गेल्या हंगामात त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे नेतृत्व केले होत. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना या संघाने प्लेऑफपर्यंत मजल मारली होती. यावेळी दिल्लीच्या फॅन्सलाही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बोलताना तो म्हणाला की, ' हो, मी दिल्ली कॅपिटल्सचा उपकर्णधार बोलतोय.' गेल्या हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना दिसून आला होता. मात्र लिलावाआधी त्याला रिलीझ करण्याचानिर्णय घेण्यात आला होता. आगमी हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सने त्याला २ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.