Jos Buttler: T-20 WC आधी इंग्लंडचं टेन्शन वाढलं! जोस बटलरच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह,कारण..

Jos Buttler, ENG vs PAK: आयसीसी टी-२० वर्ल्डकपआधी इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिकेचा थरार सुरु आहे.
Jos Buttler: T-20 WC आधी इंग्लंडचं टेन्शन वाढलं! जोस बटलरच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह,कारण..
jos buttlersaam tv

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेपूर्वी इंग्लंड आणि पाकिस्ताना या दोन्ही संघांमध्ये ४ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडचा संघ सध्या आघाडीवर आहे. या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी(२८ मे) पार पडणार आहे. मात्र या सामन्यात जोस बटलर खेळताना दिसून येणार नाहीये. मालिकेतील दुसरा सामना झाल्यानंतर तो कौटुंबिक कारणास्तव घरी परतला आहे.

जोस बटलरकडे इंग्लंड संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याने सोमवारी झालेल्या सराव सत्रात सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे तो तिसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. मालिकेतील चौथा सामना गुरुवारी खेळला जाणार आहे. हा सामना झाल्यानंतर गुरुवारी इंग्लंडचा संघ अमेरिकेला जाण्यासाठी रवाना होणार आहे. जोस बटलर केव्हा कमबॅक करणार आणि तो इंग्लंड संघासोबत अमेरिकेला जाणार की नाही? हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

Jos Buttler: T-20 WC आधी इंग्लंडचं टेन्शन वाढलं! जोस बटलरच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह,कारण..
T20 World Cup 2024: IPL संपली आता रंगणार टी-२० वर्ल्डकपचा थरार! केव्हा होणार टीम इंडियाचे सामने?

जोस बटलर तिसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्यामुळे त्याने काही दिवस कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंड संघाची जबाबदारी जोस बटलरवर सोपवण्यात आली आहे. या स्पर्धेत इंग्लंडचा पहिला सामना ४ जून रोजी स्कॉटलँडसोबत होणार आहे. त्यामुळे तो या सामन्यासाठी हजर राहणार की नाही, हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

जर या सामन्यासाठी उपलब्ध राहु शकला नाही, तर इंग्लंडचा संघ उपकर्णधारासह मैदानात उतरु शकतो. जोस बटलर सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेत शानदार कामगिरी केल्यानंतर त्याने पाकिस्तानविरुद्ध सुरु असलेल्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यातही वादळी खेळी केली होती.

Jos Buttler: T-20 WC आधी इंग्लंडचं टेन्शन वाढलं! जोस बटलरच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह,कारण..
BCCI Head Coach: टीम इंडियाच्या हेड कोचसाठी सचिन तेंडुलकरसह धोनीनेही भरला फॉर्म? यादी पाहून BCCI हैराण

आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी असा आहे इंग्लंडचा संघ:

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले,लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टॉपली, मार्क वुड, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com