Emerging Asia Cup 2024, Team India Schedule: येत्या काही दिवसात इमर्जिंग एशिया कप २०२४ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी इंडिया ए संघाची घोषणा केली आहे. युवा खेळाडूंची भरमार असलेल्या या संघाची जबाबदारी स्टार फलंदाज तिलक वर्माकडे सोपवण्यात आली आहे.
या स्पर्धेचे आयोजन ओमानमध्ये केले जाणार आहे. दरम्यान या स्पर्धेत भारत - पाकिस्तान सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. केव्हा होणार हा सामना? जाणून घ्या.
एमर्जिंग एशिया कप स्पर्धेत भारतीय संघ आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात यूएईचा सामना करताना दिसून येणार आहे.
हा सामना २१ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात भारत आणि यजमान ओमानचा सामना होणार आहे. हे सर्व सामने ओमानमधील ओमान क्रिकेट अकॅडेमीच्या मैदानावर होणार आहे.
या स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना २५ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. याच दिवशी दुसऱ्या सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. तर स्पर्धेतील फायनलचा सामना २७ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल.
या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी आयपीएल २०२४ स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. ज्यात अभिषेक शर्मासह, आयुष बदोनी, प्रभसिमरन सिंग, साई किशोर यांना संधी दिली आहे.
तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग, आयुष बदोनी, निशांत सिंधु, रमनदीप सिंग, अनुज रावत, नेहाल वढेरा, अंशुल कंबोज, साई किशोर, राहुल चाहर, आकिब खान, रितिक शौकीन, वैभव अरोडा, रासिख सलाम.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.