IND A vs PAK A: पाकिस्तानने सामना फिक्स केला? आधी नो बॉलवर विकेट नंतर एज नसतानाही केलं आउट; पाहा नेमकं काय घडलं

Emerging Asia Cup Final 2023: सुरुवातीलाच असं काहीतरी घडलं ज्यामुळे नेटकऱ्यांनी पाकिस्तान संघावर फिक्सिंगचा आरोप केला आहे .
ind a vs pak a
ind a vs pak asaam tv
Published On: 

Emerging Asia Cup Final 2023 Final IND A vs PAK A: भारत अ आणि पाकिस्तान अ या दोन्ही संघांमध्ये उदयोन्मुख आशिया चषक २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना पार पडला. अंतिम समन्यात भारतीय खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघाला विजयासाठी ३५३ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय सं-घाने दमदार सुरुवात करून दिली होती.

मात्र सुरुवातीलाच असं काहीतरी घडलं ज्यामुळे नेटकऱ्यांनी पाकिस्तान संघावर फिक्सिंगचा आरोप केला आहे .

ind a vs pak a
Rohit Sharma Record: रोहितचा भीमपराक्रम! दुसऱ्या कसोटीत महेला जयवर्धनेचा 'हा' मोठा रेकॉर्ड मोडत बनला नंबर 1

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमने सामने येतात त्यावेळी चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो.

पाकिस्तानने भारतीय संघासमोर ३५३ धावांचं भलंमोठं आव्हान ठेवलं होतं. आव्हान मोठं असताना देखील भारतीय संघातील सलामीवीर फलंदाजांनी ६४ धावांची दमदार सुरुवात करून दिली होती.

हे दोघेही फलंदाज भारतीय संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना अंपायरने चुकीचा निर्णय दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

नो बॉलवर साई सुदर्शनची विकेट..

पाकिस्तानच्या गोलंदाजांचा पाय क्रीझच्या बाहेर पडला होता, तरीदेखील अंपायरने साई सुदर्शनला बाद घोषित केल्याचे पाहायला मिळाले आहे. साई सुदर्शन २९ धावांवर फलंदाजी करत होता, त्यावेळी तो झेलबाद झाला.

मात्र रिप्लेमध्ये पाहिलं असताना स्पष्टपणे दिसून येत होतं की, गोलंदाजांचा पाय क्रीझच्या बाहेर आहे. मात्र असं असतानाही अंपायरने नो बॉल न देता साई सुदर्शनला मैदान सोडण्यास सांगितले. या निर्णयानंतर पाकिस्तानला फिक्सर म्हणायला सुरुवात झाली आहे. (Latest sports updates)

ind a vs pak a
IND vs WI 2nd Test: खेळाडू असावा तर असा; विराटला भेटताच या खेळाडूच्या आईला अश्रू अनावर; मिठी मारत म्हणाली.. -VIDEO

बॅटला बॉल न लागताच फलंदाज झेलबाद..

उदयोन्मुख आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अम्पायरिंग खूप खालच्या दर्जाची असल्याचे पाहायला मिळाले आहे. पाकिस्तान संघाकडून १३ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद वसीम ज्युनियर गोलंदाजी करण्यासाठी आला होता.

त्यावेळी फलंदाजी करत असलेल्या निकीनने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल बॅटला लागलाच नव्हता. मात्र पाकिस्तानी खेळाडूंनी अपील करताच अंपायरने त्याला आउट घोषित केलं. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत होतं की, बॉल थायपॅडला लागून गेला आहे.

मात्र अंपायरने त्याला आउट घोषित केलं. DRS नसल्याने त्याला पॅव्हेलियनची वाट धारावी लागली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.