

Yuzvendra Chahal Marriage: भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल टी-२० क्रिकेटमधील प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. मैदानावर असताना अनेक दिग्गज फलंदाजांना तो आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत असतो.
तर मैदानाबाहेर तो आपल्या मजेशीर स्वभावामुळे ओळखला जातो. युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा हे दोघेही २०२० मध्ये विवाह बंधनात अडकले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत त्याने विवाह होण्यापूर्वीचा रोमांचक किस्सा सांगितला आहे.
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची जोडी ही प्रसिद्ध जोडींपैकी एक आहे. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. दोघांचे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात.
हे क्युट कपल डिसेंबर २०२० मध्ये विवाह बंधनात अडकलं होतं. विवाह होण्यापूर्वी धनश्री वर्माने युझवेंद्र चहलला विवाह करण्यासाठी नकार दिला होता. तिने युझवेंद्र चहल समोर एक अट ठेवली होती. तिचं म्हणणं होतं की, आधी समोर भेट. दोघांची मुंबईमध्ये भेट झाली, त्यानंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. (Dhanashree Verma And Yuzvendra Chahal Marriage)
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची भेट लॉकडाऊन दरम्यान झाली होती. युझवेंद्र चहल हा धनश्री वर्माकडे डान्स शिकण्यासाठी गेला होता. त्यावेळी दोघांची ओळख झाली होती. इथून दोघांनी एकमेकांसोबत बोलायला सुरुवात केली. या चर्चेचा शेवट विवाहाने झाला. (Latest sports updates)
युझवेंद्र चहलने ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 'लॉकडाऊन सुरु असताना मी माझ्या कुटुंबासोबत राहत होतो. ही पहिलीच वेळ होती जेव्हा मी माझ्या गुरुग्रामच्या घरात ३-४ महिने राहत होतो. त्यावेळी मी माझ्या कुटुंबातील सदस्यांसह आणि पाळीव प्राण्यांसह एकत्र वेळ घालवला होता. त्यावेळी मला समजलं होतं की, धनश्री वर्मा ऑनलाईन डान्स क्लासेस घेते. मी २ महिने हा डान्स क्लास अटेंड केला.'
तसेच तो पुढे म्हणाला की , 'मी तिला विचारलं होतं की, तू इतकी आनंदी कशी राहतेस? तेव्हा ती म्हणाली होती की, मी अशीच आहे. हे ऐकल्यानंतर मला तिच्याकडून चांगली वाईब मिळाली. मी तिच्याबद्दल माझ्या कुटुंबाला सांगितलं. मी तिला सांगितलं की, मला विवाह करायचा आहे. मला डेटिंग करण्यात वेळ वाया घालवायचा नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.