

दिल्ली कॅपिटल्सचा विकेटकीपर-फलंदाज अभिषेक पोरेल सध्या एका गंभीर वादात अडकला आहे. पश्चिम बंगालमधील हुगली जिल्ह्यातील मोगरा पोलीस ठाण्यात एका महिलेने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केलीये. या तक्रारीत महिलेने आरोप केला आहे की, पोरेलने लग्नाचं खोटं आश्वासन देऊन तिच्यासोबत तीन वर्षे संबंध ठेवले तसंच नंतर मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
महिलेच्या तक्रारीनुसार ती आणि अभिषेक पोरेल यांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या काळात दोघांमधील नातं सुरुवातीला नॉर्मल होतं. मात्र 2025 मध्ये काही कारणांमुळे दोघांमध्ये मतभेद वाढू लागले. त्यानंतर पोरेलने तिच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली आणि याच गोष्टीतून वाद अधिक वाढत गेला. अखेर हा वाद इतका वाढला की प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं.
23 जून रोजी महिला आणि तिच्या आईने मोगरा पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवली. तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. सध्या पोलीस दोन्ही बाजूंकडून माहिती गोळा करत असून संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी सुरू आहे.
या आरोपांवर अभिषेक पोरेलने नकार दिला आहे. त्याचं म्हणणं आहे की, तो सध्या चांगली कामगिरी करत असल्यामुळे त्याचं नाव विनाकारण या वादात ओढलं जात आहे. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, “मी सध्या चांगलं क्रिकेट खेळतोय त्यामुळे माझ्याबद्दल अशा चर्चा होत आहेत. पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर मी या विषयावर सविस्तर बोलेन. आत्तापर्यंत माझी पोलीसांशी कोणतीही चर्चा झालेली नाही.”
आयपीएल 2026 मध्ये अभिषेक पोरेलला फारसे सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. दिल्ली कॅपिटल्सकडून त्याला फक्त चार डाव खेळायला मिळाले, ज्यामध्ये त्याने एकूण 108 रन्स केलेत. यामध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याने अर्धशतकही झळकावलं होतं. फ्रँचायझीने त्याला 4 कोटी रुपयांना कायम ठेवले होते.
आयपीएलनंतर मात्र त्याने बंगाल प्रो टी20 लीगमध्ये चांगली कामगिरी केली. या स्पर्धेत तो चौथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने सहा सामन्यांत 68.75 च्या सरासरीने आणि 159.88 च्या स्ट्राईक रेटने 275 धावा केल्या. यामध्ये त्याने तीन अर्धशतकं केलीयेत. त्याचा सर्वोत्तम स्कोअर नाबाद 94 धावा होता, जो त्याने 53 चेंडूत 6 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने केला.
अभिषेक पोरेलने 2022 मध्ये बंगालच्या टीमकडून तिन्ही प्रकारात पदार्पण केलंय. आतापर्यंत त्याने 32 फर्स्ट क्लास सामने आणि 23 लिस्ट ए सामने खेळले आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि 12 अर्धशतकं आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने दोन शतके आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.