Fastest Fifty in 2024 : १५ चेंडूंतच ठोकलं अर्धशतक, फ्रेजर मॅक्गर्कनं स्वतःचाच रेकॉर्ड मोडला, बुमराहलाही सोडलं नाही!

MI vs DC : दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर जेक फ्रेजर मॅक्गर्क यांनं अवघ्या १५ चेंडूंत अर्धशतक ठोकलं आणि यंदाच्या IPL स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतकाच्या स्वतःच्याच विक्रमाशी बरोबरी केली.
Fastest Fifty in 2024, Jake Fraser-McGurk
Fastest Fifty in 2024, Jake Fraser-McGurk SAAM TV

दिल्लीचं अरुण जेटली स्टेडियम, हजारो प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं मैदान...मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला हायव्होल्टेज सामना...रखरखतं ऊन आणि दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर जेक फ्रेजर मॅक्गर्क यांची तळपलेली बॅट. अवघ्या १५ चेंडूंत मॅक्गर्कनं अर्धशतक ठोकलं आणि यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक करण्याच्या स्वतःच्याच विक्रमाशी बरोबरी केली.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हे लहान मैदान आहे आणि इथं धावांचा पाठलाग करणंच योग्य राहिल, असं हार्दिक पंड्या म्हणाला. हार्दिक पंड्याचा हा निर्णय दिल्लीचा सलामीवीर मॅक्गर्क यानं चुकीचा ठरवला. मैदानात फलंदाजीला उतरताच त्यानं मुंबईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घ्यायला सुरुवात केली. पहिल्याच षटकात ल्यूक वुडला १९ धावा कुटल्यानंतर जसप्रीत बुमराह गोलंदाजीसाठी आला. मॅक्गर्कनं यॉर्कर किंगला त्याच्या पहिल्याच षटकात चोपून काढला. बुमराहनं या षटकात १८ धावा दिल्या.

Fastest Fifty in 2024, Jake Fraser-McGurk
Hardik Pandya : T20 वर्ल्डकप आणि हार्दिक पंड्याबाबत 'सिक्सर किंग' युवराज सिंहचं मोठं वक्तव्य; रोहित-सूर्याचं नावही घेतलं नाही!

मॅक्गर्कनं अवघ्या १५ चेंडूंमध्ये याच आयपीएलमधलं दुसऱ्यांदा सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं. याआधीही त्यानं १५ चेंडूतच अर्धशतक ठोकलं होतं. पियुष चावलाच्या चेंडूवर उत्तुंग षटकार खेचून त्यानं हा रेकॉर्ड केला. याच मैदानात मॅक्गर्कने सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध १५ चेंडूंत अर्धशतक झळकावलं होतं.

अनुभवी फिरकी गोलंदाज पियुष चावलानंच मॅक्गर्कची शिकार केली. पियुषच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. त्यानं ६ षटकार आणि ११ चौकार ठोकले. ३११.११ च्या स्ट्राइक रेटने त्यानं २७ चेंडूंत ८४ धावा केल्या.

Fastest Fifty in 2024, Jake Fraser-McGurk
Reva Parab: देशातील सर्वात मोठ्या स्विमेथॉनमध्ये नवी मुंबईची १२ वर्षीय रेवा परब ठरली अव्वल

आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक वेगवान अर्धशतके झळकावणारे खेळाडू

जेक फ्रेजर मॅक्गर्क - १५ चेंडूत अर्धशतक, विरुद्ध मुंबई

जेक फ्रेजर मॅक्गर्क - १५ चेंडूत अर्धशतक, विरुद्ध संघ हैदराबाद

ट्रेविस हेड - १६ चेंडू, विरुद्ध दिल्ली

अभिषेक शर्मा - १६ चेंडू, विरुद्ध मुंबई इंडियन्स

सूर्यकुमार यादव - १७ चेंडू, विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

ट्रेविस हेड - १८ चेंडू विरुद्ध मुंबई इंडियन्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com