Hardik Pandya : T20 वर्ल्डकप आणि हार्दिक पंड्याबाबत 'सिक्सर किंग' युवराज सिंहचं मोठं वक्तव्य; रोहित-सूर्याचं नावही घेतलं नाही!

Yuvraj Singh on Hardik Pandya : आगामी टी २० वर्ल्डकपमध्ये एकाच षटकात सहा षटकार खेचण्याच्या विश्वविक्रमाशी फक्त हार्दिक पंड्याच बरोबरी करू शकतो, असा विश्वास युवराजनं व्यक्त केला आहे.
Yuvraj Singh Hardik pandya and Rohit Sharma, T20 World Cup 2024
Yuvraj Singh Hardik pandya and Rohit Sharma, T20 World Cup 2024SAAM TV

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणारा आणि त्यामुळं ट्रोलधाडीच्या कचाट्यात सापडलेल्या हार्दिक पंड्याच्या बाबतीत दिग्गज क्रिकेटपटू आणि सिक्सर किंग युवराज सिंहनं मोठं वक्तव्य केलं आहे. आगामी टी २० वर्ल्डकपमध्ये एकाच षटकात सहा षटकार खेचण्याच्या विश्वविक्रमाशी फक्त हार्दिक पंड्याच बरोबरी करू शकतो, असा विश्वास युवराजनं व्यक्त केला आहे.

टी २० वर्ल्डकप स्पर्धा २ ते २९ जून या कालावधीत अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये होणार आहे. आयसीसीनं या स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून युवराजची नेमणूक केली आहे. युवराजनं २००७ च्या वर्ल्डकप स्पर्धेत स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात सहा षटकार तडकावले होते. टी २० वर्ल्डकपच्या इतिहासात हा एक विक्रम आहे. अजूनही त्या विक्रमाशी कुणीही बरोबरी करू शकला नाही. यंदाच्या टी २० वर्ल्डकपमध्ये या विक्रमाशी कोण बरोबरी करणार याबाबत युवराजनं मोठं वक्तव्य केलं आहे. त्यानं सूर्यकुमार यादव किंवा रोहित शर्माचंही नाव घेतलं नाही. तर सध्या फॉर्मशी झुंजणाऱ्या हार्दिक पंड्यावर त्यानं विश्वास ठेवला आहे.

टी २० वर्ल्डकपचा ब्रँड अॅम्बेसिडर असलेला युवराज सिंह (Yuvraj Singh) या पृथ्वीतळावरचा सर्वात वेगवान धावपटू असलेला उसेन बोल्ट आणि स्फोटक फलंदाज ख्रिस गेल यांच्यासह या स्पर्धेच्या प्रचार आणि प्रसारमोहिमेत सहभागी होणार आहे. आयसीसीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर युवराज सिंहचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात आगामी टी २० वर्ल्डकपमध्ये कोणता खेळाडू एका षटकात सहा षटकार खेचून तुझ्या विक्रमाशी बरोबरी करेल असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर युवराज सिंहनं हार्दिक पंड्याचं नाव घेतलं आहे.

Yuvraj Singh Hardik pandya and Rohit Sharma, T20 World Cup 2024
IPL Match Today : दिल्ली विरुद्ध मुंबईत घमासान, कोण जिंकणार? संभाव्य प्लेइंग इलेव्हन आणि पिच रिपोर्ट

युवराजनं जरी हार्दिक पंड्याचं नाव घेतलं असलं तरी, आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करताना तो फारशी कमाल दाखवू शकलेला नाही. त्याला अद्याप फॉर्म गवसलेला नाही. दुसरीकडे टी २० वर्ल्डकप स्पर्धेत सूर्यकुमार यादव हा उत्कृष्ट कामगिरी करू शकतो असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

सूर्यकुमार यादव टी २० मध्ये अव्वल

सूर्यकुमार यादव हा टी २० रँकिंगमध्ये क्रमांक एकवर आहे. तर टी २० वर्ल्डकपच्या सेमिफायनलमध्ये प्रवेश करू शकतात अशा चार संघांचं नाव युवराजनं जाहीर केलं आहे. युवराजच्या म्हणण्यानुसार, भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि इंग्लंड हे चार संघ सेमिफायनलमध्ये एन्ट्री करू शकतात.

हार्दिक पंड्याची आयपीएलमधील कामगिरी

हार्दिक पंड्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करत आहे. पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी साजेशी होऊ शकली नाही. आतापर्यंतच्या आठ सामन्यांत फक्त तीन सामन्यांमध्येच विजय मिळवता आलाय. तर पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागलाय. गुणतालिकेत मुंबईचा संघ नवव्या स्थानी आहे.

Yuvraj Singh Hardik pandya and Rohit Sharma, T20 World Cup 2024
T-20 World Cup: टी-२० वर्ल्डकपमधून हार्दिक पंड्याचा पत्ता कट? या विस्फोटक फलंदाजाला मिळणार स्थान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com