David Warner On Retirement: WTC च्या अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! संघातील प्रमुख खेळाडूने केली मोठी घोषणा

WTC Final 2023: या महत्वाच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघातील दिग्गज खेळाडूने निवृत्तीबाबत मोठं भाष्य केलं आहे.
team australia
team australia saam tv
Published On: 

Ind vs Aus WTC FINAL 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. हा सामना येत्या ७ ते ११ जून दरम्यान लंडनमधील द ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे.

या सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू जोरदार सराव करताना दिसून येत आहेत. दरम्यान या महत्वाच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघातील दिग्गज खेळाडूने निवृत्तीबाबत मोठं भाष्य केलं आहे.

team australia
WTC 2023 Final: IPL ची ट्रॉफी हुकली म्हणून काय झालं? रोहितकडे विराटला मागे सोडत इतिहास रचण्याची संधी..

ऑस्ट्रेलिया संघातील दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नरने पुन्हा एकदा निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. यापूर्वी त्याने म्हटले होते की, २०२४ वर्ल्ड कप स्पर्धेनंतर निवृत्ती जाहीर करणार आहे. आता कसोटी क्रिकेटमधुन निवृत्तीबाबत त्याने मोठे वक्तव्य केले आहे.

आऊट ऑफ फॉर्म असलेल्या डेव्हिड वॉर्नरने म्हटले आहे की, ३ जानेवारी रोजी पाकीस्तान संघाविरुद्ध सिडनीच्या मैदानावर होणारा सामना हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे.

आऊट ऑफ फॉर्म वॉर्नर..

डेव्हिड वॉर्नर हा गेल्या काही महिन्यांपासुन आऊट ऑफ फॉर्म आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये खेळल्या गेलेल्या १७ सामन्यांमध्ये त्याला एकही शतक झळकावता आले नाही. त्याची कामगिरी पाहता, तो संघात आपलं स्थान टिकवून ठेवतो का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. डेव्हिड वॉर्नरला आपला शेवटचा टी-२० सामना हा २०२४ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळायचा आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडीज आणि अमेरीकेत पार पडणार आहे. (Latest sports updates)

team australia
CSK Trophy : देव पावला! IPL जिंकताच चेन्नईची ट्रॉफी पोहोचली तिरुपतीच्या चरणी -VIDEO

याबाबत बोलताना त्याने म्हटले की, 'मी यापुर्वी देखील म्हटलं आहे की, वर्ल्ड कप स्पर्धा माझी शेवटची स्पर्धा असेल. जर मी इथे धावा केल्या तरी देखील मी पुढे खेळणं सुरु ठेवणार नाही. जर मी आता धावा केल्या आणि पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या मालिकेपर्यंत टिकुन राहीलो तर, त्या मालिकेत कारकिर्दीचा शेवट करेल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.