David Warner Celebration: जल्लोष तर होणारच! ज्या संघाने बाहेर केलं त्याच संघाला पराभूत करताच वॉर्नरचं हटके सेलिब्रेशन

David Warner Celebration Video: डेव्हिड वॉर्नर जोरदार सेलिब्रेशन करताना दिसून आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
David Warner Celebration
David Warner Celebration Twitter
Published On

SRH VS DC IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ३४ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या रोमांचक सामन्याचा निकाल शेवटचा शतकांत लागला. शेवटच्या षटकापर्यंत दोन्ही संघांना विजय मिळवण्याची संधी होती.

मात्र शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या मुकेश कुमारने सामना फिरवला आणि दिल्ली कॅपिटल्स संघाला ७ धावांनी विजय मिळवून दिला. हा दिल्ली कॅपिटल्स संघाचा या हंगामातील दुसरा विजय आहे.

या विजयानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर जोरदार सेलिब्रेशन करताना दिसून आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

David Warner Celebration
लाखो तरुणांच्या सर्च हिस्ट्रीमध्ये Paige Spiranac चा बोलबाला! हिचा फोटो पाहून पोरं होतात झिंगालाला

या समन्यात विजय मिळवताच दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर जोरदार सेलिब्रेशन करताना दिसून आला आहे. मुकेश कुमारने शेवटचा चेंडू टाकताच, दिल्लीचा विजय निश्चित झाला. यानंतर बाउंड्रीलाईनवर क्षेत्ररक्षण करत असलेला डेव्हिड वॉर्नर आनंदाने उड्या मारू लागला.

सनरायझर्स हैदराबाद संघाला अंतिम षटकात विजय मिळवण्यासाठी १३ धावांची गरज होती. मात्र हैदराबाद संघाला केवळ ५ धावा करता आल्या. (David Warner Celebration)

मुकेश कुमारच्या गोलंदाजीबाबत बोलताना डेव्हिड वॉर्नर म्हणाला की, 'हा सामना खूप आव्हानात्मक होता. मात्र दबावात असूनही मुकेश कुमारने अप्रतिम गोलंदाजी केली.' तसेच ईशांत शर्मा बाबत बोलताना डेव्हिड वॉर्नर म्हणाला की, 'त्याने आयपीएल स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी प्रचंड मेहनत केली आहे. पुनरागमन करत त्याने अप्रतिम कामगिरी देखील केली आहे. आजचा सामना आम्ही जिंकलाय. आशा करतो की आम्ही विजयाची हॅट्रिक करू. सनरायझर्स हैदराबाद संघासोबत आमचा आणखी एक सामना होणार आहे.' (Latest sports updates)

David Warner Celebration
Sachin Tendulkar Birthday: सचिनसोबत घडला होता विचित्र प्रसंग! डायपर लावून मैदानात उतरला अन् ठोकल्या 97 धावा..

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून फलंदाजी करताना मनीष पांडेने ३४ धावांची खेळी केली. तर अक्षर पटेलने देखील ३४ धावांचे बहुमुल्य योगदान दिले.

या खेळीच्या जोरावर ९ गडी बाद १४४ धावा केल्या. ता धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाकडून मयांक अगरवालने ४९ धावांची खेळी केली. तर हेनरिक क्लासेनने ३१ धावा केल्या. शेवटी वॉशिंग्टन सुंदरने नाबाद २४ धावांची खेळी केली. मात्र तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या सामन्यात दिल्ल्ली कॅपिटल्स संघाने ७ धावांनी विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com