CSK vs RR Match Prediction: गुरू की शिष्य कोण मारणार विजयाची हॅटट्रिक? पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

CSK vs RR Playing 11: आज आयपीएल २०२३ स्पर्धेतील १७ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे.
CSK VS RR Match Prediction
CSK VS RR Match PredictionSaam Tv
Published On: 

CSK vs RR Match Preview: आज आयपीएल २०२३ स्पर्धेतील १७ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे.

जोरदार फॉर्ममध्ये असलेला चेन्नई सुपर किंग्ज संघ आपल्या घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्स संघाला धूळ चारण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

CSK VS RR Match Prediction
Umpire Salary in IPL: अजिंक्य रहाणे अन् रिंकू सिंग पेक्षाही जास्त आहे अंपायरची सॅलरी! एका हंगामाचा पॅकेज ऐकून बसेल धक्का

दोन्ही संघांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, दोन्ही संघांनी ३ सामने खेळले आहेत. यादरम्यान दोन्ही संघांनी प्रत्येकी २ सामने जिंकले आहेत. तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने दिल्लीवर जोरदार विजय मिळवला होता. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाने कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स संघाला आपल्या घरच्या मैदानावर जाऊन पराभूत केले होते. दोन्ही संघ आपला शेवटचा सामना जिंकले आहेत. त्यामुळे या सामन्यात जोरदार लढत पाहायला मिळू शकते. (Latest sports updates)

CSK VS RR Match Prediction
Rinku Singh IPL 2023: उमेश यादवच्या 4 शब्दांचा इम्पॅक्ट अन् रिंकूने ठोकले खणखणीत 5 षटकार! काय म्हणाला उमेश यादव? वाचा

पिच रिपोर्ट..

चेन्नईची खेळपट्टी फिरकी गोलदाजांसाठी फायदेशीर ठरू शकते. दोन्ही संघात फिरकी गोलंदाज असतील तर दोन्ही संघांसाठी हे फायदेशीर ठरेल. १६० किंवा १८० हा आव्हानात्मक स्कोर आहे. नाणेफेक जिंकणारा संघ क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग 11:

चेन्नई सुपर किंग्ज:

डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मिचेल सँटनर, महेश थिक्षना, राजवर्धन हंगरगेकर, तुषार देशपांडे

राजस्थान रॉयल्स :

जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com