csk
csktwitter

GT vs CSK Match Result: चेन्नई सुपर डुपर किंग्ज! गुजरातला लोळवून दहाव्यांदा फायनलमध्ये, कुणाशी भिडणार?

GT vs CSK Qualifier: चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२३ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
Published on

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. क्वालिफायर १ चा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाला विजय मिळवण्यासाठी १७३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाला १५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२३ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

चेन्नईने उभारला १७२ धावांचा डोंगर..

या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने ४४ चेंडूंचा सामना करत ७ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ६० धावांची खेळी केली. तर डेवोन कॉनव्हेने ३४ चेंडूंचा सामना करत ४ चौकारांच्या साहाय्याने ४० धावांची खेळी केली. तर रवींद्र जडेजाने २२, अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायुडूने प्रत्येकी १७-१७ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने ७ गडी बाद १७२ धावा केल्या.

गिलची झुंज ठरली अपयशी...

गुजरात टायटन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना वृद्धीमान साहा अवघ्या १२ धावा करत माघारी परतला. तर शुभमन गिलने एकाकी झुंज देत ३८ चेंडूंचा सामना करत ४२ धावांची खेळी केली. शेवटी राशिद खानने ३० धावांचे योगदान दिले. मात्र गुजरातचा संघ विजयापासून १५ धावा दूर राहिला.

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

गुजरात टायटन्स : शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), दासुन शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थिक्षाना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com