Tino Best: तो माझा विक पॉइंट, ५०० पेक्षा जास्त महिलांशी शरीरसंबंध..., क्रिकेटरच्या दाव्याने खळबळ

Tino Best Statement: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू टिनो बेस्टने खळबळजनक दावा केला आहे. मी आतापर्यंत जगभरातील ५०० पेक्षा जास्त महिलांसोबत शरीरसंबंध ठेवले. त्याने आत्मचरित्रात हा दावा केला आहे.
Tino Best: तो माझा विक पॉइंट, ५०० पेक्षा जास्त महिलांशी शरीरसंबंध..., क्रिकेटरच्या दाव्याने खळबळ
Tino BestSaam Tv
Published On

वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू टिनो बेस्ट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. टिनो बेस्टने एक मोठा खुलासा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. टिनो बेस्टने त्याच्या 'माइंड द विंडोज: माय स्टोरी' या आत्मचरित्रात त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा दावा केला आहे. '५०० पेक्षा अधिक महिलांसोबत शरीरसंबंध होतो.', असे त्याने आत्मचरित्रात लिहिले. तो विनोदाने स्वतःला 'ब्लॅक ब्रॅड पिट' असे म्हणतो. यामुळे त्याची चांगलीच चर्चा होत आहे. याआधी देखील तो वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे.

बार्बाडोसमध्ये जन्मलेल्या टिनो बेस्टबद्दल असे म्हटले जात होते की तो भविष्यात एक महान क्रिकेटपटू होईल. या ५ फूट ८ इंचाच्या क्रिकेटपटूची तुलना दिग्गजांशी केली जात होती. पण तो आपल्या करिअरमध्ये तितका यशस्वी होऊ शकला नाही. त्याच्या कारकिर्दीला २००३ मध्ये सुरुवात झाली. टिनो बेस्टने ब्रिजटाऊनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्यानंतर त्याने २००४ मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना आणि २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळला. टिनो बेस्टला आयपीएलमध्ये कधीही संधी मिळाली नाही.

Tino Best: तो माझा विक पॉइंट, ५०० पेक्षा जास्त महिलांशी शरीरसंबंध..., क्रिकेटरच्या दाव्याने खळबळ
Shocking : धरणाच्या बॅकवॉटर जवळ १०० जनावरांचा मृत्यू, यवतमाळमध्ये खळबळ | VIDEO

'माइंड द विंडोज: माय स्टोरी' या आत्मचरित्रात टिनो बेस्टने खुलासा केला की, 'त्याचे ५०० पेक्षा अधिक महिलांसोबत शरीरसंबंध होते. त्याच्या या जीवनशैलीचा त्यांच्या मैदानावरील कामगिरीवर कधीही परिणाम झाला नाही. तो त्याचे वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून क्रिकेटसाठी खूप मेहनत करायचा.

टिनो बेस्टने त्यांच्या आत्मचरित्रात असेही लिहिले आहे की, 'मुली ही माझी कमजोरी आहे. मला मुली खूप आवडतात. मला वाटते की मी जगातील सर्वात देखणा टक्कल असलेला पुरूष आहे आणि मी काळा ब्रॅड पिट आहे. मी जिथे जिथे क्रिकेट खेळायला गेलो तिथे तिथे मी मुलींशी बोललो आणि त्यांना डेट केले. यानंतर गोष्टी शरीरसंबंधापर्यंत पोहोचल्या. मी जगभरातील सुमारे ५०० ते ६५० मुलींसोबत झोपलो आहे.'

Tino Best: तो माझा विक पॉइंट, ५०० पेक्षा जास्त महिलांशी शरीरसंबंध..., क्रिकेटरच्या दाव्याने खळबळ
Shocking News: AI च्या मदतीने बनवले महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडीओ, डॉक्टरविरोधात गुन्हा; साताऱ्यात खळबळ

टिनो बेस्टने पुढे असे देखील सांगितले की, 'माझी पहिली गर्लफ्रेंड मेलिसाशी ब्रेकअप झाल्यानंतर माझे मन खूप दुखावले होते आणि परिस्थिती बिघडली. मेलिसापासून मला तमानी नावाची मुलगी आहे. ब्रेकअपनंतर मी महिलांबाबत खूपच वेडा झालो. मला एक मुलगी हवी होती आणि तिच्याशी बोलायचे होते. कोणतीही मुलगी मला घाबरवू शकत नव्हती. जगातील सर्वात सुंदर मुली ऑस्ट्रेलियाच्या आहेत. त्या खूपच सुंदर आहेत आणि फिटनेसकडे खूप लक्ष देतात.'

Tino Best: तो माझा विक पॉइंट, ५०० पेक्षा जास्त महिलांशी शरीरसंबंध..., क्रिकेटरच्या दाव्याने खळबळ
Shocking Reel Video: बाई हा काय प्रकार! रस्त्यावर दिसेल त्याला बियर दिली; पोलिसांनी केली कडक कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com