Shocking : धरणाच्या बॅकवॉटर जवळ १०० जनावरांचा मृत्यू, यवतमाळमध्ये खळबळ | VIDEO

Yavatmal animals death : यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात वेंणी धरणाच्या बॅकवॉटरजवळ १०० जनावरांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. वीज पडल्यामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज आहे, तर काहींनी विषबाधेचा संशयही व्यक्त केला आहे.

Yavatmal Animals Death News : यवतमाळच्या महागाव तालुक्यातील वेणी धरणाच्या बॅक वॉटर जवळ असलेल्या धारकान्हा शेत शिवारात शंभर जनावरे मृत्यूमुखी पडल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी सायंकाळी वादळी वारासह पाऊस आला होता, त्यावेळी वीज पडून धरणाच्या बॅकवॉटर जवळ चरत असलेल्या जनावरांवर वीज पडून त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महसूल प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून गावातील जनावरे रात्री घरी न आल्याने आज सकाळी शेतकरी धरणाच्या दिशेने गेले असता अनेक जनावर मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धारकान्हा गावातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयाचे नुकसान झाले आहे. दरम्यान जनावरांचा मृत्यू कशामुळे झालाय हे शवविच्छेदन केल्यानंतर समजणार आहे.

महागाव तालुक्यात 100 जनावरं दगावल्यानं खळबळ उडालीय. वेणी धरणाच्या बॅक वॉटर जवळ असलेल्या धारकान्हा शेत शिवारात ही जनावरं दगावल्याची घटना घडली. वीज पडून जनावरांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. मात्र बॅकवॉटरमध्ये काही मिसळण्यात आलं होतं का? यादृष्टीनंही तपास केला जातोय. या घटनेमुळे धारकान्हा गावातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान जनावरांचा मृत्यू नेमका कशामुळे झालाय, हे शवविच्छेदन केल्यानंतरच समोर येणारेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com