Ranji Trophy: कसोटी मालिकेसाठी पुजाराने कंबर कसली! रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात झळकावली डबल सेंच्युरी

Cheteshwar Pujara Double Century: भारतीय संघातून बाहेर असलेल्या चेतेश्वर पुजाराची बॅट रणजी ट्रॉफी स्पर्धेत चांगलीच गरजतेय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेपूर्वी त्याला संघाबाहेर करण्यात आलं होतं
cheteshwar pujara
cheteshwar pujaratwitter
Published On

Cheteshwar Pujara Double Century In Ranji Trophy:

भारतीय संघातून बाहेर असलेल्या चेतेश्वर पुजाराची बॅट रणजी ट्रॉफी स्पर्धेत चांगलीच गरजतेय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेपूर्वी त्याला संघाबाहेर करण्यात आलं होतं. मात्र रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याने दुहेरी शतकी खेळी करत दमदार कमबॅक केल्याचं पाहायला मिळालं आहे. मुख्य बाब म्हणजे येत्या काही दिवसात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे.

माध्यमातील वृत्तानुसार आज (७ जानेवारी) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. जे खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाचा भाग होते. त्या खेळाडूंना या संघात प्राधान्य दिलं जाईल. दरम्यान चेतेश्वर पुजाराच्या दुहेरी शतकी खेळीनंतर नक्कीच निवडकर्त्यांच्या अडचणीत वाढ झाली असणार आहे.

पुजाराचं दुहेरी शतक..

रणजी ट्रॉफी स्पर्धेत पुजारा सौराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करतोय. या संघाचा पहिला सामना झारखंडविरुद्ध सुरु आहे. या संघाविरुद्ध खेळताना त्याने आपलं दुहेरी शतक पूर्ण केलं असून त्याची तिहेरी शतकाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. (Latest sports news in marathi)

cheteshwar pujara
Team India News: शुभमन गिलचं टीम इंडियातील स्थान धोक्यात! पुजाराने कसली कंबर

सौराष्ट्रची दमदार सुरुवात..

या सामन्यात सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटने नाणेफक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सौराष्टच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत झारखंडचा डाव अवघ्या १४२ धावांवर संपुष्टात आणला. या धावांचा पाठलाग करताना सौराष्ट्रने ५०० पेक्षाही अधिक धावा करत मोठी आघाडी घेतली आहे.

सौराष्ट्रच्या फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. या संघाकडून हार्विक देसाई (८५), शेल्डन जॅक्सन (५४) आणि अर्पित वसावड़ा (६८) यांनी अर्धशतकं झळकावली. पुजारासह प्रेरक मांकडने शतकं झळकावली.

cheteshwar pujara
Cheteshwar Pujara Comeback: पुजाराचं संघात कमबॅक होणं कठीण! रोहितच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com