Cheteshwar Pujara Comeback: पुजाराचं संघात कमबॅक होणं कठीण! रोहितच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ

Rohit Sharma On Shubman Gill: रोहितने केलेल्या वक्तव्यावरून आता पुजाराचं होणं कठीण दिसून येत आहे.
cheteshwar pujara
cheteshwar pujarasaam tv
Published On

IND vs WI 1st Test: भारत विरुद्व वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतून चेतेश्वर पुजाराला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्याच्याऐवजी युवा खेळाडूंना संघात स्थान दिलं गेलं आहे.

संघाबाहेर होताच पुजाराने दिलीप ट्रॉफी स्पर्धेत शतक झळकावले आहे. तो भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे.

मात्र पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे पुजाराचं कमबॅक करणं कठीण दिसून येत आहे.

cheteshwar pujara
WI Vs IND 1st Test, Day 1: पहिल्या दिवशी टीम इंडियाच सरस,अश्विनच्या करामतीनंतर हिटमॅनची - जयस्वालची यशस्वी फटकेबाजी; पाहा Scorecard

काय म्हणाले गिल आणि रोहित शर्मा

कर्णधार रोहित शर्माने म्हटले की, 'शुभमन गिलने राहुल द्रविडसोबत चर्चा केली आणि तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. टीम मॅनेजमेंटने ददेखील या प्रस्तावाला मान्यता दिली.' यावरून हे स्पष्ट आहे की, शुभमन गिल कुठल्याही क्रमाकांवर फलंदाजी करण्यासाठी तयार आहे.

या सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी यशस्वी जयस्वाल मैदानात उताराला आहे. तर गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसून येणार आहे. जर हा प्रयोग यशस्वी ठरला. तर पुजाराचं कमबॅक होणं कठीण आहे. भारत -वेस्टइंडीज कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ थेट डिसेंबर महिन्यात कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तोपर्यंत पुजाराकडे दमदार कामगिरी करून निवडकर्त्यांचं लक्ष वेधून घेण्याची संधी असणार आहे. (Latest sports updates)

cheteshwar pujara
Shubman Gill Catch Video: चान्स पे डान्स! शॉट लेगला डाइव्ह मारत गिलचा भन्नाट कॅच; VIDEO एकदा पाहाच

पुजाराची खालावलेली कामगिरी..

चेतेश्वर पुजारा हा भारतीय कसोटी संघातील विश्वासू खेळाडूंपैकी एक आहे. राहुल द्रविडनंतर पुजाराला भारतीय संघाची भिंत म्हटलं जातं. २०१० मध्ये पदार्पण करणारा पुजारा भारतीय संघात तिसऱ्या क्रमांकावर खेळतो.

गेल्या ४ वर्षांपासून त्याला केवळ २ शतक झळकावता आले आहे. त्याने २०१९ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सिडनीच्या मैदानावर १९३ धावांची खेळी केली होती. त्यानंतर २०२२ मध्ये बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात त्याने १०२ धावांची खेळी केली होती.

याव्यतिरिक्त त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही. २०१० पासून ते २०१९ पर्यंत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मात्र गेल्या ४ वर्षात त्याची कामगिरी खालावली आहे. त्याने गेल्या ४ वर्षात केवळ २९ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com