
चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने हायब्रीड मॉडलवर खेळवले जाणार आहेत. आयसीसीनं शुक्रवारी त्यावर शिक्कामोर्तब केलं. याशिवाय आयसीसीनं पाकिस्तानची एक अट मान्य केली आहे. त्यानुसार, पाकिस्तान संघ भारतात आपले सामने खेळणार नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी हायब्रिड मॉडलवर शिक्कामोर्तब केलं आहे. आयसीसीनं हायब्रिड मॉडलला अखेर मंजुरी दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सामन्यांच्या संदर्भात सहमती झाली आहे. भारतीय क्रिकेट संघ आपले सामने दुबईत खेळणार आहे. तर अन्य सामने हे पाकिस्तानात होतील. याशिवाय २०२६ मधील टी २० वर्ल्डकपमधील साखळी फेरीतील सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही. हा सामना कोलंबोत खेळवला जाईल.
स्पोर्ट्स तकच्या रिपोर्टनुसार, यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कुठलाही मोबदला मिळणार नाही. असं जरी असलं तरी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं २०२७ नंतर आयसीसी महिला टुर्नामेंटच्या यजमानपदाचे अधिकार मिळवले आहेत.
पाकिस्तानने मागील आठवड्यात आयसीसीच्या बैठकीवर बहिष्काराची धमकी दिली होती. पण तो निर्णय त्यांनी मागे घेत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हायब्रिड मॉडेलला सहमती दर्शवली होती. तसेच २०३१ पर्यंत आपल्यासाठीही याच पद्धतीच्या नियोजनाची मागणी केली होती. पण आता आयसीसीने २०२६ पर्यंत सर्व स्पर्धांसाठी हायब्रिड मॉडलवर सहमती दर्शवली आहे.
या कालावधीत भारतीय संघ पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये महिला वनडे वर्ल्डकप आणि श्रीलंकेसोबत संयुक्तरित्या २०२६ मध्ये होणाऱ्या टी २० वर्ल्डकप (पुरुष) स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे.
तत्पूर्वी, भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आपले सामने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला होता. तसेच स्पर्धा हायब्रिड मॉडलवर खेळवण्यात यावी, अशी मागणी केली होती. अखेर भारताच्या या मागणीला यश आले असून, आयसीसीने हायब्रिड मॉडेलला मंजुरी दिली आहे.
आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडलवर खेळण्यास मंजुरी दिल्यानं आता भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी होईल यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. आता भारताचे सामने पाकिस्तानात होणार नसून, ते तटस्थ ठिकाणी म्हणजेच दुबईत होणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.