
जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे पाचव्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी
कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंह यांना संघात संधी मिळण्याची शक्यता
इंग्लंडच्या संघात चार मोठे बदल, स्टोक्सच्या जागी ओली पोप कर्णधार
ध्रुव जुरेल यष्टीरक्षक म्हणून खेळणार
India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मालिकेतील अखेरचा आणि पाचवा सामना आज द ओव्हल, लंडन येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेत इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतलेली आहे. हा सामना जिंकून इंग्लंड मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरले, तर टीम इंडिया हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. पाचव्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात चार मोठे बदल करण्यात आले आहे. नियमित कर्णधार बेन स्टोक्स या सामन्यात नसल्याने भारताला जिंकण्याची नामी संधी असेल. अखेरच्या कसोटी सामन्यात भारताच्या संघातही काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहेत. रिपोर्ट्सनुसार, आजच्या सामन्यात बुमराह खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्याशिवाय कुलदीप यादव याला प्लेईंग ११ मध्ये संधी मिळू शकते.
अँडरसन-तेंडुलकर मालिकेत इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारताला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीत भारताने दमदार खेळ करत अनिर्णित सोडवला होता. ओव्हलच्या खेळपट्टीवर फिरकी आणि वेगवान गोलंदाजी यांचा समतोल राखण्यासाठी भारताने कुलदीप आणि अर्शदीप यांना संधी देण्याचा विचार केला आहे. मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांच्यावर गोलंदाजीची मोठी जबाबदारी असेल. यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत पायाच्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी ध्रुव जुरेल यष्टिरक्षक म्हणून खेळेल.
फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याला या मालिकेत आतापर्यंत खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, ओव्हलच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता असल्याने कुलदीपला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. कुलदीपच्या जाळ्यात इंग्लंड अडकण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अर्शदीप सिंग याचेही कसोटी पदार्पण होऊ शकते. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला या सामन्यात कसोटी पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. मँचेस्टर कसोटीत दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता, पण आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे.
पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात चार मोठे बदल करण्यात आले आहेत. नियमित कर्णधार बेन स्टोक्सच्या दुखापतीमुळे हे बदल करण्यात आले आहेत. ऑली पोप याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर जेकब बेथेल, गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन आणि जोश टंग यांना संघात स्थान देण्यात आले आहे. जोफ्रा आर्चर आणि लियाम डॉसन यांना आराम देण्यात आला आहे.
यशस्वी जायस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आकाशदीप, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.