
भारताने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधील दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडला तब्बल 336 रन्सने नमवत सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली आहे. हा सामना बर्मिंघमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळवण्यात आला होता. विशेष म्हणजे या सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती, पण आता तो तिसऱ्या टेस्टमध्ये तो पुन्हा मैदानात उतरणार आहे. अशी माहिती कर्णधार शुभमन गिलने दिली.
या सिरीजमध्ये मॅच प्रेझेंटरची भूमिकेत जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन आहे. यावेळी तिने जेव्हा सुनील गावसकर आणि चेतेश्वर पुजारा यांना विचारलं की, "दुसरी टेस्ट जिंकल्यानंतर टीममध्ये काही बदल होणार का?" तेव्हा दोघांनीही स्पष्ट उत्तर दिलं की, "कुठलाही बदल करण्याची गरज नाही!"
मुख्य म्हणजे संजनाला हे ऐकून आश्चर्य वाटलं. गावस्कर काही क्षण गप्प राहिलं आणि मग हसत म्हणाले, "एकदा का सामना जिंकलात मग बदल करणं कठीण होऊन जातं. पण जर बुमराहला घ्यायचं असेल, तर प्रसिध कृष्णाला बाहेर बसवावं लागेल.
चेतेश्वर पुजाराने सुद्धा सुनील गावस्करांच्या मताचं समर्थन केलं. त्यानेही हे मान्य केलं की जसप्रीत बुमराहचं संघात परतणं हे टीम इंडियासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
टीम इंडियाचा कॅप्टन शुभमन गिलने स्वतः स्पष्ट केलं की जसप्रीत बुमराह तिसऱ्या टेस्टमध्ये खेळणार आहे. ज्यावेळ संजना गणेशन हिने सुनील गावसकर आणि चेतेश्वर पुजारा यांना विचारलं की दुसरा सामना जिंकल्यानंतर टीममध्ये काही बदल होणार का, तेव्हा दोघांनीही उत्तर दिलं – "टीममध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही." पण गिलच्या घोषणेनंतर हे स्पष्ट झालंय की, बुमराहच्या कमबॅकमुळे एक बदल निश्चित आहे.
दुसरीकडे करुण नायर फॉर्ममध्ये नसल्यामुळे त्याला तिसऱ्या टेस्टमध्ये बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. अशावेळी साई सुदर्शनला पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण नायरने आतापर्यंत सिरीजमध्ये फारशी चांगली कामगिरी केली नाही.
दुसऱ्या टेस्ट सामन्यात उत्तम कामगिरी करत आकाश दीपने 10 विकेट्स घेतल्या. त्यामुळे टीम मॅनेजमेंट त्याचा पु्न्हा विचार करू शकते. त्यामुळे आता आकाश दीपबाबत टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.
तिसऱ्या टेस्टसाठी टीम सिलेक्शनचं गणित आता चर्चेचा विषय ठरतोय. लॉर्ड्सवर होणाऱ्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत प्लेईंग ११ मध्ये कोणती निवड करतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण एकीकडे आकाश दीपने एजबॅस्टन टेस्टमध्ये १० विकेट्स घेऊन आपलं महत्व सिद्ध केलं आहे, आणि दुसरीकडे बुमराहसारखा अनुभवी आणि मॅचविनर खेळाडू टीममध्ये परतणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.