Liver disease: एड्सपेक्षाही धोकादायक आहे 'हा'लिव्हरचा आजार; 'साइलेंट किलर' समस्येची लक्षणंही वेळीच जाणून घ्या

Hepatitis B silent killer: हेपेटायटीस बी हा एक गंभीर व्हायरल इन्फेक्शन आहे. अनेकदा या आजाराला 'सायलेंट किलर' असं म्हटलं जातं, कारण याची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात दिसत नाहीत किंवा ती इतकी सामान्य असतात की लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.
Liver disease
Liver diseasesaam tv
Published On

चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्या मागे लागतात. मुळात गंभीर आजार म्हटलं की,‘एड्स’ (HIV/AIDS) चं नाव हमखास घेतलं जातं. पण वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, याच्याहीपेक्षा अधिक घातक आजार म्हणजे हेपेटायटिस बी. हा एक व्हायरल आजार असून, तो थेट यकृतावर (लिवर) परिणाम करतो.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, वेळेवर निदान आणि उपचार न झाले नाही तर यामुळे लिवर फेल होऊ शकतं. इतकंच नाही तर यकृताचा म्हणजेच लिव्हरचा कॅन्सर देखील होऊ शकतो.

संसर्ग होण्याचा धोका अधिक

हेपेटायटिस बी आणि एचआयव्ही दोन्ही आजार संक्रमित रक्त, वापरलेली सुई, असुरक्षित लैंगिक संबंध किंवा संक्रमित आईपासून नवजात बाळाला होतो. पण हेपेटायटिस बीचा विषाणू एचआयव्हीच्या तुलनेत 100 पट जास्त संसर्गजन्य आहे. अगदी थोडीशी बेजबाबदारपणामुळे या व्हायरसच्या संक्रमणाला निमंत्रण देऊ शकते.

Liver disease
Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

सुरुवातीला लक्षणं दिसतच नाहीत

हेपेटायटिस बी या आजाराची सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत. लक्षणं असली तरी ती इतकी सौम्य असतात की आपण सामान्य म्हणून ती सोडून देतो. कावीळ, सतत थकवा, पोटदुखी, भूक न लागणं किंवा यकृताला सूज अशी गंभीर लक्षणं दिसू लागतात. अशी लक्षणं दिसल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लिवर सिरोसिस

हेपेटायटिस बीचा व्हायरल लिव्हरमधील पेशींना हळूहळू खराब करतो. यामुळे लिव्हर सिरोसिस होण्याचा आणि हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा म्हणजे लिवर कॅन्सर होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. ही स्थिती प्राणघातक ठरू शकते.

Liver disease
Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

या समस्येवर उपचार मर्यादित

हेपेटायटिस बीसाठी उपचार मर्यादित आहेत. त्यामुळे या आजाराविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण (वॅक्सिनेशन) हाच सगळ्यात प्रभावी मार्ग आहे. हेपेटायटिस बीची लस सुरक्षित आणि उपयुक्त असून, ती वेळेवर घेतली गेल्यास आजार टाळता येतो.

Liver disease
Body changes after cancer: कॅन्सर झाल्यानंतर शरीरामध्ये कोणते मोठे बदल दिसून येतात?

जगभर झपाट्याने पसरणारा आजार

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), सध्या जगभरात २५ कोटींपेक्षा जास्त लोक हेपेटायटिस बीच्या क्रॉनिक इन्फेक्शनने ग्रस्त आहेत, तर एचआयव्हीच्या तुलनेत हे प्रमाण बऱ्याच पटींनी अधिक आहे. भारतातही दरवर्षी लाखो नवीन रुग्ण आढळून येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com