
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानच्या पहिल्या टेस्ट नंतर ICC ने बुधवारी टेस्ट खेळाडूंच्या ताज्या रँकिंग जाहीर केल्या आहेत. या रँकिंगमध्ये काही बदल दिसून आले आहेत आणि भारतीय खेळाडूंना त्याचा फायदा झाला आहे.
टीम इंडियाचा जलद गोलंदाज मोहम्मद सिराज आणि स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा या दोघांना टेस्ट रँकिंगमध्ये मोठा फायदा मिळाला आहे. भारताने अहमदाबादमध्ये खेळलेल्या पहिल्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजला एक डाव आणि 140 रन्सने पराभूत केल. या टेस्टच्या दोन्ही डावांमध्ये सिराजने एकूण 7 विकेट्स घेतल्या. ज्याचा थेट फायदा त्याला ICC रँकिंगमध्ये मिळाला. दोघांनाही त्यांच्या करिअरमध्ये सर्वोच्च रेटिंग मिळालं आहे.
मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) ने ICC टेस्ट बॉलर्स रँकिंगमध्ये तीन पायऱ्या वर चढत 12व्या स्थानावर पोहोचलाय. त्यांच्या करिअरची सर्वोत्तम रेटिंग मिळाली असून त्यांचं खातं सध्या 718 रेटिंग अंकांनी भरलेलं आहे. टेस्ट बॉलर्स रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर जसप्रीत बुमराह कायम आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये 3 विकेट्स घेतल्या होत्या.
टेस्ट फलंदाजांच्या रँकिंगमध्येही बदल झाला आहे. स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja ICC Rankings) ने आपल्या करिअरची सर्वोच्च रेटिंग मिळवली आहे. त्यांच्या 644 पॉईंट्स झालेत. त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये नाबाद शतक आणि 4 विकेट्स घेतल्या, ज्यामुळे हा फायदा मिळाला. जडेजाने 6 स्थानांची झेप घेत तो 25व्या स्थानावर पोहोचलाय.
याशिवाय, डावीकडील फलंदाज केएल राहुलनेही या टेस्टमध्ये शतक केलं. ज्यामुळे तो 4 स्थान पुढे म्हणजेच 35व्या स्थानावर आला. इंग्लंडचे दिग्गज जो रूट 908 अंकांसह टॉपवर कायम आहेत.
ICC मेन्स टेस्ट बॅटर्स रँकिंगमध्ये यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) ला नुकसान सहन करावं लागलंय. तो दोन स्थानांनी खाली घसरला असून 7व्या स्थानावर पोहोचलाय. टॉप-5 मध्ये त्याला जागा मिळाली नाही. श्रीलंकेचे कामिंदु मेंडिस एक स्थान पुढे येत 6व्या स्थानावर आलंय. तर टेम्बा एका स्थान पुढे आला असून तो पाचव्या स्थानावर पोहोचला.
ICC टेस्ट ऑलराउंडर्स रँकिंगमध्ये टॉपवर रवींद्र जडेजा कायम आहे. त्यांचं 430 रेटिंग आहे. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर चार स्थानांची उडी घेऊन 11व्या स्थानावर पोहोचलाय. तर वेस्ट इंडिजचा शमार जोसेफ एका स्थानाने खाली घसरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.