नवी दिल्ली : बर्मिंघम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताने सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकण्याचा धडाकाच उठवला आहे. आज प्रसिद्ध बॉक्सर अमित पंघल, महिला बॉक्सर नितू घनघासनंतर आता बॉक्सर निखत जरीनने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. निखतने उत्तर आयर्लंडच्या कॅरी मॅकनॉलचा पराभव करत बर्मिंघम भारताचा झेंडा फडकवला आहे. (nikhat zareen wins gold medal )
निखतने ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम उत्तर आयर्लंडच्या कॅरी मॅकनॉलचा ५-० असा पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. निखतच्या विजयाने भारताने आज दिवसभरात बॉक्सिंगमध्ये तिसरं सुवर्णपदक जिंकलं आहे. निखतने या पहिल्या फेरीत चांगलंच वर्चस्व गाजवलं. सर्व पंचांकडून निखतने १० पैकी १० गुण घेतले. दुसरा फेरीतही निखतने संयमी खेळ दाखवला. त्यानंतर तिने तिसऱ्या फेरीत सातत्य राखत सुवर्णपदक खिशात घातले.
दरम्यान,आजच प्रसिद्ध बॉक्सर अमित पंघलनेही दमदार कामगिरी केली. त्यानेही आज भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर नितूने ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या डेमी-जेड रेसटानचा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. २१ वर्षीय नितूने पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेतला. तिने २०१९ साली जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक विजेती डेमीचा ५-० या मोठ्या फरकाने पराभूत केले आहे. नितू मागच्या सामन्यात ज्या प्रकारे खेळली, त्याच प्रकारे खेळत तिने सुवर्णपदक जिंकलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.