
बीसीसीआयनं प्रत्येक फ्रँचायझीला जास्तीत जास्त पाच खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी दिली आहे.
महिला प्रीमियर लीगचा चौथा हंगाम २०२६ च्या सुरुवातीला खेळवला जाईल.
बीसीसीआयनं महिला प्रीमियर लीगच्या मेगा ऑक्शनपूर्वी सर्व फ्रँचायझींना ईमेलद्वारे नवीन गाइडलाइन पाठवली आहे.
महिला प्रीमियर लीग (WPL) चे आतापर्यंत तीन हंगाम खेळले गेलेत. तर चौथा हंगाम २०२६ च्या सुरुवातीला खेळला जाणार आहे. महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामापूर्वी एक मेगा खेळाडू लिलाव आयोजित केला जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने आधीच तयारी सुरू केली आहे. मोठ्या लिलावाबाबत बीसीसीआयने फ्रँचायझींना गाइडलाइन पाठवली. यात जास्तीत जास्त पाच खेळाडूंना रिटेन करू देण्यास मुभा देण्यात आली आहे.
ESPNcricinfo मधील एका वृत्तानुसार, WPL च्या चौथ्या हंगामापूर्वी होणाऱ्या मेगा प्लेअर लिलावाबाबत BCCI ने सर्व फ्रँचायझींना दिलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये फक्त 5 खेळाडूंना कायम ठेवता येणार आहे. यामध्ये तीनपेक्षा जास्त कॅप्ड भारतीय खेळाडू, दोन परदेशी खेळाडू आणि दोन अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश नसावा.
जर एखाद्या फ्रँचायझीने पाच खेळाडू कायम ठेवण्याचा निर्णय घेतला तर त्यांना एका अनकॅप्ड खेळाडूला कायम ठेवणे आवश्यक असेल, असं गाइडलाइन मध्ये सांगण्यात आले आहे. सर्व फ्रँचायझींना त्यांच्या राखून ठेवलेल्या खेळाडूंची नावे ५ नोव्हेंबरपर्यंत द्यावी लागतील. यात २५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान मेगा लिलाव आयोजित केला जाण्याची शक्यता आहे.
पहिल्यांदाच लिलावात संघांना आरटीएमचा पर्याय देण्यात आलाय. वुमेन्स प्रीमियर लीगच्या मेगा लिलावाबाबत बीसीसीआयनं नवीन नियम जारी करण्यात आलेत. यात खेळाडूंच्या लिलावादरम्यान, फ्रँचायझींना RTM म्हणजेच राईट टू मॅच कार्ड वापरण्याची संधी देखील मिळणार आहे. यात ते लिलावाच्या किमतीत त्यांच्या संघातील कोणत्याही जुन्या खेळाडूला पुन्हा समाविष्ट करू शकतात.
एका संघाला जास्तीत जास्त पाच आरटीएम कार्ड वापरण्याची संधी मिळेल. परंतु राखून ठेवलेल्या खेळाडूंच्या संख्येनुसार ही संख्या कमी केली जाणार आहे. जर एखाद्या फ्रँचायझीने चार खेळाडू राखले तर त्यांना एक आरटीएम कार्ड वापरण्याची परवानगी असणार आहे. तर तीन खेळाडूंना रिटेन केल्यास २ आरटीएम आणि दोन खेळाडू रिटेन केल्यानंतर चार आरटीएम कार्ड वापरण्यास मुभा असणार आहे.
मेगा प्लेअर ऑक्शनमध्ये फ्रँचायझींना १५ कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी असेल. यात जर एखादा संघ आधी ५ खेळाडूंना रिटेन करतील तर त्यांच्या पर्समधील थेट ९.२५ कोटी रुपये खर्च होतील. यात पहिल्या खेळाडूसाठी त्यांच्या पर्समधून ३.५ कोटी रुपये कमी होतील. दुसऱ्यासाठी २.५ कोटी, तिसऱ्यासाठी १.७४ कोटी, चौथ्यासाठी एक कोटी आणि पाचव्या खेळाडूसाठी फक्त ५० लाख रुपये खर्च करता येतील. जर चार खेळाडूंना कायम ठेवले तर फ्रँचायझीच्या त्यांच्या पर्समधून ८.७५ कोटी रुपये कमी होतील, तर तीन खेळाडूंसाठी ७.७५ कोटी रुपये कमी होतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.