Rohit Sharma: मोठी बातमी! रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांना मुकणार; कारण...

Border- Gavaskar Trophy: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सुरुवातीच्या २ कसोटी सामन्यात खेळताना दिसून येणार नाही. काय आहे कारण? जाणून घ्या.
Rohit Sharma: मोठी बातमी! रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांना मुकणार; कारण...
rohit sharma yandex
Published On

Rohit Sharma News In Marathi: भारतीय संघासाठी नोव्हेंबर महिना अतिशय महत्वाचा असणार आहे. या महिन्यात भारतीय संघ बॉर्डर - गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. २२ नोव्हेंबरपासून या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान या मालिकेपूर्वी भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. कारण कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणास्तव उपलब्ध नसणार आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामनातून माघार घेऊ शकतो. बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, याबाबत कुठलीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. हे सर्व परिस्थितीवर निर्भर करेल. मात्र रोहितने आधीच बीसीसीआयला याबाबत कल्पना दिली आहे. रोहित सुरुवातीचे १ किंवा २ सामन्यासाठी उपलब्ध राहणार नाही. रोहित आपल्या दुसऱ्या बाळाच्या जन्मासाठी उपलब्ध राहणार नसल्याची चर्चा सुरु आहे.

Rohit Sharma: मोठी बातमी! रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांना मुकणार; कारण...
IND vs BAN, 2nd T2OI: टीम इंडियाच्या विजयाची सप्तमी! बांगलादेशला नमवत मालिकेत घेतली २-० ची विजयी आघाडी

नुकताच भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने बांगलादेशला २-० ने धूळ चारली. आता भारतीय संघ मायदेशात न्यूझीलंड संघाचा सामना करताना दिसून येणार आहे. या मालिकेला येत्या १६ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. त्यानंतर २२ नोव्हेंबरपासून भारत - ऑस्ट्रेलिया मालिकेला सुरुवात होणार आहे.

Rohit Sharma: मोठी बातमी! रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांना मुकणार; कारण...
IND vs BAN: तन्जीम साकिबच्या जादूई बॉलवर Abhishek Sharmaची बत्ती गुल; स्टम्प उडून पडला लांब- VIDEO

या खेळाडूला संधी मिळणार?

भारताचा स्टार फलंदाज केएल राहुलला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संधी देण्यात आली होती. या मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली. या कामगिरीच्या बळावर त्याला न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी संधी दिली जाऊ शकते. जर त्याने या मालिकेतही चांगली कामगिरी केली. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर - गावसकर ट्रॉफीसाठी त्याची भारतीय संघात निवड केली जाऊ शकते

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com