
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेला येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र हायब्रिड मॉडेलनूसार भारतीय संघाचे सामने यूएईत रंगणार आहे.
या स्पर्धेसाठी सर्व संघांनी आपल्या स्क्वाडची घोषणा केली आहे. दरम्यान आयसीसीने या स्पर्धेसाठी अंपायर्स आणि मॅच रेफरीची घोषणा केली आहे. ज्यात अशा एका अंपायरचा समावेश आहे, जो भारतीय संघासाठी नेहमीच पनौती ठरतो.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी आयसीसीने मॅच रेफरी म्हणून ऑस्ट्रेलियाच्या डेविड बून, श्रीलंकेच्या रंजन मदुगले आणि झिम्बाब्वेच्या अँड्रयू पायक्राफ्ट यांची निवड केली आहे. तर अंपायर म्हणून आयसीसीने कुमार धर्मसेना, ख्रिस गॅफनी, मायकल गॉ, अॅड्रियन होल्डस्टॉक,रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबोरो, अहमान रजा, पॉल रायफेल, शारफुद्दोला इब्ने शाहीद, रॉड टकर, अॅलेक्स व्हार्फ आणि जोएल विल्सन यांचा समावेश करण्यात आला आहे.
आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी रिचर्ड केटलबोरोची देखील अंपायर म्हणून निवड केली आहे. रिचर्ड केटलबोरो अंपायर म्हणून बेस्ट आहे. पण भारतीय संघासाठी ही वाईट बातमी आहे. आयसीसी स्पर्धेतील नॉकआऊट सामन्यांमध्ये जेव्हा जेव्हा रिचर्ड केटलबोरो अंपायर म्हणून होते, ते सामने भारतीय संघाने गमावले आहेत.
ज्यात वनडे वर्ल्डकप २०२३ फायनल, २०२१ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, २०२३ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, २०१५ वनडे वर्ल्डकप सेमीफायनल, २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, २०१४ टी-२० वर्ल्डकप फायनल आणि २०१६ मध्ये झालेल्या वर्ल्डकप सेमीफायनलचा समावेश आहे. या सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सर्व सामन्यांमध्ये रिचर्ड केटलबोरो हे अंपायरच्या भूमिकेत होते.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक...
19 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची
20 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई
21 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची
22 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर
23 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई
24 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी
25 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी
26 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर
27 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी
28 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर
1 मार्च - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची
2 मार्च- न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई
4 मार्च- उपांत्य फेरी-1, दुबई
5 मार्च- उपांत्य फेरी-2, लाहोर
9 मार्च - फायनल, लाहोर (भारत अंतिम फेरीत पोहोचल्यास दुबईमध्ये खेळला जाईल)
10 मार्च - राखीव दिवस
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.