LSG vs PBKS, IPL 2024: पंजाबविरुद्धच्या सामन्याआधी लखनऊला मोठा धक्का! संघातील प्रमुख खेळाडू स्पर्धेतून बाहेर

David Willey Ruled Out: या सामन्यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार खेळाडूने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Big blow for lucknow super giants david willey ruled out from ipl 2024 matt henry named as replacement
Big blow for lucknow super giants david willey ruled out from ipl 2024 matt henry named as replacement twitter

David Willey Ruled Out From IPL 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर रंगणार आहे. हा लखनऊ सुपर जायंट्स संघाचा या हंगामातील दुसराच सामना असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार खेळाडूने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

स्टार खेळाडूची स्पर्धेतून माघार..

पंजाब किंग्ज संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी पंजाब किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विलीने आयपीएल २०२४ स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने वैयक्तिक कारणास्तव आपलं नाव मागे घेतलं आहे. त्याच्या जागी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेनरीचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याला १.२५ कोटींच्या बेस प्राईजवर संघात स्थान दिलं गेलं आहे.

Big blow for lucknow super giants david willey ruled out from ipl 2024 matt henry named as replacement
IPL 2024,Fact Check: पाथिराना खरंच धोनीच्या पाया पडला का? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

मॅट हेनरीला न्यूझीलंड संघाकडून २५ कसोटी, ८२ वनडे आणि १७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळण्यापूर्वी त्याने पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१७ मध्ये तो पंजाब किंग्ज संघाकडून खेळताना दिसून आला होता.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

लखनऊ सुपरजायंट्स - केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, देवदत्त पडिक्कल, निकोलस पूरन, दीपक हुड्डा, कृणाल पंड्या, मार्कस स्टोइनिस, रवि बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान आणि यश ठाकुर.

पंजाब किंग्ज- शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, सिकंदर रजा, लियाम लिविंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शशांक सिंग, हरप्रीत बरार, कगिसो रबाडा, हर्षल पटेल आणि राहुल चाहर.

Big blow for lucknow super giants david willey ruled out from ipl 2024 matt henry named as replacement
Venkatesh Iyer Six: वेंकटेश अय्यरने मारला IPL 2024 स्पर्धेतील सर्वात लांब षटकार;पाहा Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com