लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धात झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दमदार विजय मिळवला. या सामन्यात राजस्थान संघाचा खेळाडू रियान परागने दमदार फलंदाजी केली. परागच्या खेळीने चाहत्यांची मने जिंकली. नेहमी खराब खेळीमुळे टीकेचा धनी बनत असलेल्या परागने लखनऊविरुद्धात केलेल्या फटकेबाजीने टीकाकारांची तोंड बंद झाली. परागने आपल्या खेळीने क्रिकेट प्रेमींना आनंद दिल्यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्याच्या नावाने वेगवेगळे मीम्स बनवत चाहत्यांनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारलीय.(Latest News)
बऱ्याचवेळा खराब कामगिरीमुळे ट्रोल होणाऱ्या रियान परागने अप्रतिम फलंदाजी केली. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर लखनौविरुद्ध त्याने लांबलचक षटकार मारलेत. परागने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील फॉर्म काय ठेवत कर्णधार संजू सॅमसनसोबत ९३ धावांची भागीदारी केली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
संघाने २ गड गमावल्यानंतर रियान पराग फलंदाजीसाठी मैदानात उतरला. परागने संघ व्यवस्थापनाचा निर्णय योग्य सिद्ध करत त्याने २९ चेंडूत ४३ धावा केल्या. परागने १ चौकार आणि ३ षटकार ठोकले. सॅमसनसह त्याने संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. ज्यावेळी संघाची धावसंख्या ४९/२ अशी होती तेव्हा पराग फलंदाजीला आला होता.
कर्णधार सॅमसनसह मोठी भागीदारी करत त्याने संघाची धावसंख्या १४२/३ वर नेली. सोशल मीडियावर चाहत्यांनी परागचे कौतुक केलं. पराग या सीझनमध्ये अप्रतिम कामगिरी करेल असं त्याच्या चाहत्यांना वाटत आहे. हा मोसम त्यांच्यासाठी करा किंवा मरो असाच आहे. पुढील हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे.
त्याआधी परागला त्याला त्याच्या खेळाची छाप सोडायची आहे. संघातील आपले स्थान मजबूत करण्यावर त्याचं लक्ष आहे. आजच्या सामन्यातील परागाचा खेळ पाहून चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं. परागसंदर्भात मजेदार मीम्सही शेअर करत चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय.
सोशल मीडियावरील मीम्स
रियान पराग २०१९ पासून राजस्थान संघाचा सदस्य आहे. पराग हा या मोसमात चांगली कामगिरी करेल अशी आशा संघाला आहे. परागने ५५ आयपीएल सामन्यात ६४३ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी १६.९२ आणि स्ट्राइक रेट १२५.३४ आहे. परागच्या नावावर २ अर्धशतके आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.