Ben Stokes Catch Drop: इंग्लंडच्या कॅप्टनला ओव्हर कॉन्फिडन्स नडला? स्मिथचा कॅच घेताच केलं असं काही - VIDEO

England VS Australia 5th Test: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये अॅशेस मालिकेचा थरार पार पडला.
ben stokes catch
ben stokes catchtwitter
Published On: 

Ben Stokes Dropped Steve Smith Catch: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये अॅशेस मालिकेचा थरार पार पडला. या मालिकेतील अंतिम सामन्यात इंग्लंडने ४९ धावांनी विजय मिळवला आहे. यासह ही मालिका २-२ च्या बरोबरीत समाप्त झाली आहे.

हा सामना स्टुअर्ट ब्रॉडच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. दरम्यान या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स देखील चर्चेचा विषय ठरला.

तर झाले असे की, क्षेत्ररक्षण करत असताना बेन स्टोक्सने स्टीव्ह स्मिथचा झेल टिपला. मात्र झेल पूर्ण टिपण्यापूर्वीच तो जल्लोष करताना दिसून आला. या नादात त्याचा झेल सुटला. त्यानंतर अंपायरने त्याला नाबाद घोषित केले.

ben stokes catch
IND vs WI 3rd ODI: निर्णायक सामन्यातही विराट, रोहितला विश्रांती? पाहा काय असेल टीम इंडियाचा मास्टरप्लान

ओव्हरकॉन्फिडन्स नडला?

तर झाले असे की, ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना मोईन अली गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळी फलंदाजी करत असलेल्या स्टीव्ह स्मिथने पहिल्याच चेंडूवर डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला.

कारण चेंडू त्याच्या ग्लोव्हला लागून मागे गेला. त्यावेळी लेग स्लिपला क्षेत्ररक्षण करत असलेल्या बेन स्टोक्सने डाइव्ह मारत भन्नाट झेल टिपला मात्र उत्साहाच्या भरात त्याने हा झेल पूर्ण होईल इतक्यात चेंडू त्याच्या हातून सुटला. DRS मध्ये पाहिलं असता चेंडू तर स्टीव्ह स्मिथच्या ग्लोव्हला लागला होता. मात्र हा झेल पूर्ण न झाल्याने अंपायरने त्याला नाबाद घोषित केले. (Latest sports updates)

या सामन्यात इंग्लंड संघाने ४९ धावांनी विजय मिळवला. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ३८४ धावांची गरज होती. मात्र ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव ३३४ धावांवर संपूष्टात आला. यासह अॅशेस मालिका २-२ च्या बरोबरीत समाप्त झाली आहे.

स्टुअर्ट ब्रॉडचा शेवटचा सामना..

हा सामना स्टुअर्ट ब्रॉडच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. त्याने हा सामना सुरू असतानाच निवृत्तीची घोषणा केली होती. या सामन्यातील शेवटचा विकेट देखील स्टुअर्ट ब्रॉडनेच घेतला. कसोटी क्रिकेटमध्ये ६०४ विकेट्स घेत त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीला पूर्णविराम दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.