Impact Player Rule: BCCI चा मोठा निर्णय! IPL स्पर्धेत चर्चेत राहिलेल्या नियमाला 'रेड सिग्नल'

BCCI Removed Imapact Player Rule: बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेत चर्चेत राहिलेल्या इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
Impact Player Rule: BCCI चा मोठा निर्णय! IPL स्पर्धेत चर्चेत राहिलेल्या नियमाला 'रेड सिग्नल'
cskyandex
Published On

BCCI Removed Imapct Player Rule: भारतात देशांतर्गत क्रिकेटला सुरुवात झाली आहे. ११ ऑक्टोबरपासून रणजी ट्रॉफी स्पर्धा सुरू झाली आहे. तर येत्या काही दिवसात सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेपूर्वी बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतून इम्पॅक्ट प्लेअरचा नियम वगळण्यात आला आहे.

देशांतर्गत क्रिकेटमधून हा नियम वगळला जाणार याची दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र आयपीएल २०२५ स्पर्धेत हा नियम कायम राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएल कमिटी आणि संघ मालकांची बैठक पार पडली. या बैठकीत आयपीएल २०२५ स्पर्धेबाबत काही मोठे निर्णय घेण्यात आले होते. ज्यात म्हटलं गेलं होतं की, आयपीएल २०२५ स्पर्धेत इमॅक्ट प्लेअरचा नियम कायम राहणार आहे.

Impact Player Rule: BCCI चा मोठा निर्णय! IPL स्पर्धेत चर्चेत राहिलेल्या नियमाला 'रेड सिग्नल'
IND vs BAN: जलवा है हमारा.. जे रोहित, विराट अन् धोनीलाही नाही जमलं ते सूर्या भाऊने करुन दाखवलं

केव्हा होणार स्पर्धेला सुरुवात?

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेला येत्या २४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा टी -२० फॉरमॅट मध्ये खेळली जाते. तर स्पर्धेतील फायनलचा सामना १५ डिसेंबरला खेळला जाणार आहे.

याबाबत बोलताना बीसीसीआयने म्हटले की, ' बोर्डने यावेळी इम्पॅक्ट प्लेअरचा नियम काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ' यासह बीसीसीआयने गोलंदाजांना मदत मिळण्यासाठी आणखी एक नियम लागू केला होता. ज्यात गोलंदाजांना एका ओव्हरमध्ये २ बाऊन्सर टाकण्याची अनुमती देण्यात आली होती. हा नियम कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Impact Player Rule: BCCI चा मोठा निर्णय! IPL स्पर्धेत चर्चेत राहिलेल्या नियमाला 'रेड सिग्नल'
IND vs NZ: सरफराज की राहुल? पहिल्या कसोटीसाठी रोहित कोणाला देणार संधी; पाहा प्लेइंग ११

इम्पॅक्ट प्लेअरचा नियम म्हणजे काय?

इम्पॅक्ट प्लेअरचा नियम एकदम सोपा आहे. नाणेफेक होण्यापूर्वी सर्व संघांना ४ अतिरिक्त खेळाडूंची नावं द्यावी लागतात. या ४ पैकी कुठल्याही एका खेळाडूचा सामन्यादरम्यान वापर केला जाऊ शकतो. तो फलंदाजी किंवा गोलंदाजीसाठी मैदानात येऊ शकतो. मात्र या खेळाडूचा वापर १४ व्या षटकाआधीच केला जायचा. या नियमामुळे सर्व संघांना अतिरिक्त गोलंदाज आणि अतिरिक्त फलंदाज उपलब्ध होत होता. मात्र आता असं नसणार आहे. कारण हा नियम काढून टाकण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com