
काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याचे पडसाद क्रिकेटच्या विश्वावर पडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामने खेळवले जाऊ नये अशी मागणी केली जात आहे. बीसीसीआयने भारत-पाकिस्तान द्विदेशीय मालिकांवर बंदी घातली आहे. पण आयसीसी स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने येऊ शकतात. तेव्हा वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान एका गटामध्ये असू नये अशी विनंती बीसीसीआयने पत्राद्वारे आयसीसीकडे केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
क्रीकबजच्या माहितीनुसार, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध करत मृतकांना श्रद्धांजली वाहिली. भारत-पाकिस्तान द्विदेशीय मालिका कधीही होणार नाही, सरकारद्वारे जो काही निर्णय घेतला जाईल, त्याचे पालन आम्ही करु असेही शुक्ला यांनी सांगितले. तेव्हा बीसीसीआयने आयसीसीला कुठलेच पत्र पाठवले नसल्याचेही राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले.
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भारतात महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकप होणार आहे. यात आठ संघांचा समावेश असेल. या स्पर्धेचे सामने साखळी फेरीप्रमाणे होतील. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी टीम इंडियाने पाकिस्तानमध्ये जाऊन क्रिकेट खेळणार नाही असा निर्णय घेतला होता. त्यामुळे महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपमधील पाकिस्तानचे सामने तटस्थ ठिकाणी होणार आहेत.
भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि बांगलादेश हे संघ महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपसाठी पात्र ठरले आहेत. या स्पर्धेच्या आधी पुरुष क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा दुबई किंवा श्रीलंका येथे आयोजित केली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.