BCCI Head Coach: ना लक्ष्मण,ना गंभीर; द्रविडनंतर हा परदेशी खेळाडू होऊ शकतो भारताचा नवा मुख्य प्रशिक्षक

BCCI New Head Coach: आगामी टी-२० वर्ल्डकप झाल्यानंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे.
BCCI Head Coach: ना लक्ष्मण,ना गंभीर; द्रविडनंतर हा परदेशी खेळाडू होऊ शकतो भारताचा नवा मुख्य प्रशिक्षक
bcci is looking stephen fleming as new head coach of team india after rahul dravid amd2000saam tv news
Published On

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा तोंडावर असताना बीसीसीआयने नव्या मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरु केला आहे. कारण टी-२० वर्ल्डकप स्पर्धा झाल्यानंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. याआधी राहुल द्रविडनंतर व्हीव्हीएस लक्ष्मण, गौतम गंभीर आणि आशीष नेहरा या दिग्गज भारतीय खेळाडूंच्या नावाची चर्चा होती. मात्र आता बीसीसीआय स्टीफन प्लेमिंग आणि रिकी पाँटींगला ही जबाबदारी देणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

बीसीसीआयने नुकतीच नव्या मुख्य प्रशिक्षकाचा शोध घेण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे. बीसीसीआयच्या सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, २००९ पासून चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या हेड कोचची भूमिका पार पाडणाऱ्या स्टीफन फ्लेमिंगला ही जबाबदारी दिली जाऊ शकते.

स्टीफन प्लेमिंगच्या मार्गदर्शनाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने ५ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली संघातील वातावरण खेळमेळीचं राहतं. तसेच त्याच्याकडे खेळाडूंकडून चांगली कामगिरी करुन घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याची मुख्य प्रशिक्षकपदी निवड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तसेच रेव्हस्पोर्ट्सच्या वृत्तानुसार रिकी पाँटींग देखील ही जबाबदारी दिली जाऊ शकत,अशी चर्चा सुरु आहे.

BCCI Head Coach: ना लक्ष्मण,ना गंभीर; द्रविडनंतर हा परदेशी खेळाडू होऊ शकतो भारताचा नवा मुख्य प्रशिक्षक
DC vs LSG, IPL 2024: लखनऊसाठी 'करो या मरो'ची लढत; दिल्लीविरुद्ध कसा राहिलाय रेकॉर्ड?

रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविड यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघाने तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली. त्यांचा कार्यकाळ वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर संपला होता. मात्र हा कार्यकाळ टी-२० वर्ल्डकप २०२४ पर्यंत वाढवण्यात आला. जय शाहकडून त्यांना पुन्हा एकदा मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याचा सल्ला देखील देण्यात आला. मात्र त्यांनी अद्यापही काही प्रतिसाद दिलेला नाही.

BCCI Head Coach: ना लक्ष्मण,ना गंभीर; द्रविडनंतर हा परदेशी खेळाडू होऊ शकतो भारताचा नवा मुख्य प्रशिक्षक
IPL Playoffs Scenario: दिल्लीच्या विजयाचा RCB ला फायदा! प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; या संघाचं टेन्शन वाढलं

इथून पुढे नव्या प्रशिक्षकाचा कार्यकाळ हा १ जूलै २०२४ पासून सुरु होणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, स्टीफन प्लेमिंगसह जस्टीन लेंगर देखील मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणार असल्याची चर्चा सुरु आहे. स्टीफन प्लेमिंगच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं, तर त्याने न्यूझीलंड संघासाठी १११ कसोटी सामने खेळले आहेत.यादरम्यान त्याने ७१७२ धावा केल्या आहेत. तर २८० वनडे सामन्यांमध्ये त्याने ८०३७ आणि ५ टी-२० सामन्यांमध्ये ११० धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com